आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती: प्रतीक्षाचा मारेकरी अटकेत; ताब्यात घेण्यापूर्वी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या कायदेशीर व वैयक्तिक गुंतागुंतीतून प्रतीक्षा मुरलीधर मेहत्रे (वय २४) या तरुणीचा भरदिवसा चाकूने गंभीर वार करून खून केल्याची घटना गुरुवारी अमरावतीत घडली होती. दरम्यान फरार अाराेपी राहुल बबनराव भड यास गुरुवारी मध्यरात्रीच पाेलिसांनी अटक केली. ताब्यात घेण्यापूर्वी त्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्याची प्रकृती ठीक अाहे. न्यायालयाने त्याला २९ नाेव्हेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.  


प्रतीक्षाचा खून केल्यानंतर अाराेपी राहुल शहरातून फरार झाला हाेता.  ताे दुचाकीने बडनेरा रेल्वे स्टेशनवर गेला होता. त्या ठिकाणी दुचाकी पार्किंग करून त्याने नागपूरला जाण्यासाठी रेल्वेेचे तिकीट काढले. मात्र रेल्वेत न बसता ताे पुन्हा दुचाकी घेऊन दारव्हामार्गे मूर्तिजापूरला गेला.  रात्री अकरा वाजताच्या सुमारास राहुलचे माेबाइल लाेकेशन पाेलिसांना मिळाले. त्यावरून पाेलिसांनी मध्यरात्री दीड वाजता मूर्तिजापूर गाठून त्याला अटक केली. दरम्यान, प्रतीक्षा ही माझी पत्नी हाेती, मात्र ती मला नेहमीच टाळत हाेती, त्यामुळे अापण खून केल्याची कबूली अाराेपी राहूलने पाेलिसांकडे दिली.

 

अटक करण्यापूर्वीच अाराेपीने घेतले विष  
ताब्यात घेतल्यानंतर पाेलिसांनी राहुलची झडती घेतली असता त्याच्याजवळ कीटकनाशक असलेला कागद मिळाला होता. त्यामुळे पोलिसांनी अमरावतीत येऊन त्याची तातडीने वैद्यकीय चाचणी केली. त्याने विष घेतल्याचे निष्पन्न झाले, मात्र त्याचा फारसा प्रभाव न झाल्याने राहुलची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्याला न्यायालयासमाेर हजर करण्यात अाले.

 

हे ही वाचा प्रेमप्रकरण, कायदेशीर गुंत्यातून भर रस्त्यात गळा चिरून युवतीचा खून...

बातम्या आणखी आहेत...