आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know 10 Important Facts About Rashtriya Swayamsevak Sangh Alis RSS

काय आहे RSS, कसे चालते काम, आताच वाचा या 10 महत्‍त्‍वपूर्ण गोष्‍टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कुणाला आरक्षणाची गरज आहे, याचा फेर आढावा घ्‍यावा असे मत राष्‍ट्रीय स्‍वयं सेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'पाज्‍चजन्‍य'ला दिलेल्‍या मुलाखतीतून व्‍यक्‍त केले. त्‍यामुळे या विषयाची सध्‍या देशभर चर्चा होत आहे. आरएसएस ही संस्‍था भारतीय जनता पक्षाची मातृसंस्‍था आहे. एवढेच नाही तर भाजपचे अनेक मोठे नेते हे संघाचे स्‍वयंसेवक राहिलेले आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. 27 सप्‍टेंबर 1925 ला संघाची स्‍थापना झाली. त्‍याला आता 90 वर्षे होत आली आहेत. आरएसएस काय आहे, या संघटनेचे काम कसे चालते, संघटन वाढवण्‍यासाठी काय केले जाते याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांना...
सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी स्‍वयंसेवी संस्‍था आहे. तिला संघ किंवा आरएसएस म्‍हणून ओळखले जाते. नागपूर येथे या संस्‍थेचे मुख्‍यालय आहे. संघाच्‍या पहिल्‍या शाखेत केवळ 5 व्‍यक्‍ती सहभागी होत्‍या. आज देशभरात 50 हजारांपेक्षा अधिक शाखा आहेत आणि त्‍यात लोको व्‍यक्‍ती स्वयंसेवक म्‍हणून काम करतात.
सरसंघचालक मोहन भागवत
व्‍यवसायाने पशू चिकित्सक असलेल्‍या मोहन भागवत यांची सरसंघचालक म्‍हणून 2009 मध्‍ये निवड झाली. 11 सप्‍टेंबर 1950 ला चंद्रपूर येथे त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे वडील मधुकरराव भागवत हे चंद्रपूर शाखेचे प्रमुख होते. त्‍यांनी गुजरातचे प्रांत प्रमुख प्रचारक म्‍हणूनसुद्धा काम केलेले आहे. चार भाऊ-बहिणीत मोहन भागवत हे सर्वांत मोठे आहे. त्‍यांनी अकोला येथून पशू चिकित्साचे शिक्षण घेतले. 1975 पासून संघाचे पूर्ण वेळ स्‍वयंसेवक म्‍हणून त्‍यांनी कामाला सुरुवात केली. पुढे नागपूर आणि विदर्भाचे प्रचारकसुद्धा राहिले. 1991 मध्‍ये आरएसएसच्‍या शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रमात ते अखिल भारतीय प्रमुख झाले. 21 मार्च 2009 ला त्‍यांना के. एस. सुदर्शन यांच्‍या जाग्‍यावर सरसंघचालक करण्‍यात आले.

पुढील स्‍लाइडवर वाचा संघाबाबत दहा महत्‍त्‍वपूर्ण गोष्‍टी...