आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाला स्वतंंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी चंद्रपुरात एकत्र आले कुणबी, देशमुख, पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूर- मराठी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी चंद्रपूरमध्ये सकल मराठा- कुणबी क्रांतीचा विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मराठा, कुणबी, देशमुख, पाटील समाज विना संकोच एकत्र येऊन रस्त्यावर उतरले. जाती पोटजातीमध्ये विभागलेले 96 कुळी मराठे, घाटावरचे, घाटाखालच मराठे, पाटील, देशमुख, तसेच कुणब्यातील सर्व पोटजाती धनुजे कुणबी, तिरळे कुणबी, झाडे कुणबी, खैरे कुणबी, बावने कुणबी, खेडुले कुणबी ई अशा सर्व कुणब्यांच्या पोटजातीच्या बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत.
उल्लेखनिय म्हणजे मराठा कुणबी समाजाचे सर्व पक्षिय नेते समाजाच्या नावाखाली एकत्र आल्याचे दिसून आले. सगळ्यांना मराठा कुणबी समाजासाठी प्रगतीची आस असून निश्चित समाजाच्या उज्वल भवितव्याची ही नांदी असल्याची भावना कुणबी समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.


चंद्रपूर एमआयडीसी परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. मराठा आमचेच, पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, अशा मागणीचा सूर या मोर्चातून निघाला आहे. त्याचप्रमाणेे महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे लोण आता कर्नाटकातही पोहोचले आहे. बिदरमध्ये मराठा क्रांतीचा विराट मोर्चा काढण्यात आला. सीमा भागातील हजारों मराठी बांधवांंनी मोर्चात सहभाग घेतला.

मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ठ करा- मागणी
ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला हवे. असे मत कुणबी समाजाने व्यक्त केले आहे. ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ठ करण्यात यावे, अशी नव्याने मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, रविवारी ठाण्यात निघालेल्या मोर्चात मराठा समाजाला कुणबी म्हणून जातप्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी समोर आली होती. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मराठा कुणबी म्हणून आरक्षण मागत असले, तरी त्यांचे आरक्षण कुणबी आरक्षणातून नको. तसेच ओबीसी आरक्षणाच्या सध्याच्या कोट्यातूनही नको. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण स्वतंत्र द्या. कुणबी किंवा ओबीसीमधून नकोच. त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास समर्थन, पण आरक्षण हे कुणबी आरक्षण टक्केवारीतून नको. मराठा कुणबी एकच, पण ओबीसी कुणबीच्या आरक्षणाला धक्का नकोच. आता ओबीसीमध्ये नवीन जात नको. आधीच यामध्ये 350 जातींचा समावेश आहे. वरिष्ठ जे ठरवतील ते मान्य. मराठा आमचेच पण कुणबी व्यतिरिक्त आरक्षण द्या, चंद्रपूर मोर्चात सहभागी झालेल्या कुणबी मराठा बांधवानी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हिंगोलीत नजर जाईल तिकडे मराठा, नजर जाईल तिथे भगवा, पाहा photos

पुढील स्लाइड्‍सर क्लिक करून पाहा, चंद्रपूर आणि कर्नाटकातील बिदरमध्ये निघालेल्या विराट मोर्चाचे फोटोज..
बातम्या आणखी आहेत...