आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणता राजा सोसायटीची अनाथ मुलींना लाखांची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जाणता राजा वेलफेअर सोसायटीच्या वतीने अनाथ मुलींना पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. कोंडेश्वर येथील मधुबन वृद्धाश्रम येथील कृष्णमूर्ती बालकाश्रम मधील या अनाथ मुली अाहे. पाच अनाथ मुलींचे भविष्य सुखकर व्हावे म्हणून पाच मुलींना प्रत्येकी एक लाख रुपये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात 1 मे रोजी झालेल्या “सूर मराठी स्वप्न मराठी’ कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. 
 
प्रत्येकी एक लाख रुपये मदत करण्यात आलेल्या मुलींमध्ये हेमा नागदिवे, अनुराधा पाटील, सोनाली गेडाम, सोनाली खंडारे, शुभांगी यांचा समावेश आहे. सोनाली गेडाम हिला पाेलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. भविष्यात त्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सोसायटी त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले.
 
यावेळी संपूर्ण जनसमुदाय भावूक झाला होता. या अनाथ मुलींचे पोषण करणाऱ्या प्रियदर्शनी वसतीगृह नागपूर या संस्थेला देखील सोसायटीच्या वतीने ५१ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले. जय जय महाराष्ट्र माझा, जयदेव जयदेव जय जय शिवराया, राधा ही बावरी, सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या, माऊली माऊली, खेळ मांडला, हवा के झोंके आज, गोंधळ, लावणी आदी एका पेक्षा एक हिंदी मराठी गितांचा सुरेख मेळ साधून महाराष्ट्राचा सारेगामा विजेता अनिरुद्ध जोशी, मंगेश बोरगावकर, शाल्मली सुखटनकर, आनंदी जोशी, सई टेंभेकर यांच्या गाण्याने सूर मराठी स्वप्न मराठीच्या मैफीलीला मंत्रमुग्ध केले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात जाणता राजा वेलफेअर सोसायटीच्या वतीने साईदत्त डेव्हलपर्सच्या प्रायोजकत्वाने महाराष्ट्र दिनी ‘सूर मराठी स्वप्न मराठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भरगच्च भरलेल्या प्रांगणात रसिक श्रोते बहारदार गितांनी भारावून गेले. अनेक मातब्बर गायकासोबत साथ संगत देणाऱ्या वादक कलावंतांनी अप्रतिम साथ दिली. यावेळी हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, पाेलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार, पुणे येथील नगर रचनाकार विजय शेंडे, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. संगीता कडू, सोमेश्वर पुसतकर, वैभव दलाल, तूषार भारतीय, विलास इंगोले, दिनेश बुब, विवेक कलोती, सचिन रासने, राजा मोरे, दिलीप दाभाडे, दिलीप कलोती, प्रवीण रघुवंशी, दिग्वीजय देशमुख, विजय ढोले, नंदकिशोर गुंबळे, प्राचार्य विजय दरणे, वैभव कोनलाडे, बानू बागडे उपस्थित होते. जाणता राजा सोसायटीच्या वतीने अनाथ मुलींना धनादेश देताना पोलिस आयुक्त मंडलीक मनपा आयुक्त हेमंत पवार अन्य. 
 
बातम्या आणखी आहेत...