आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रॉपर्टी डिलर खूनप्रकरणी अाठ जणांना जन्मठेप, नागपुरातील मकाेका न्यायालयाचा निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपुरात२०१२ मध्ये गाजलेल्या सूरज यादव खून प्रकरणातील मुख्य आरोपी डल्लू सरदार त्याच्या आठ साथीदारांना मकाेका न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील इतर सात आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यात पोलिसांना अपयश आल्याने त्यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सूरज यादव यांचा भूखंडावरून डल्लू सरदार या कुख्याताशी वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊन डल्लू सरदार त्याच्या साथीदारांनी १८ नोव्हेंबर २०१२ रोजी सूरजच्या घरावर हल्ला चढविला. सूरज यांच्यावर तलवारी अन्य शस्त्राचे घाव घातले. सूरज यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या पत्नी मनदीप आणि भाऊ राजेश या दोघांवरही मारेकऱ्यांनी हल्ला चढविला. सूरज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हे दाखल केले होते. सरकारी पक्षाने सूरज यांची पत्नी मनदीप, भाऊ राजेश आणि आई फुलीसाबाई यांच्यासह अन्य काही जणांची साक्ष घेतली होती. विशेष न्यायाधीश अशोक धामेचा यांनी बुधवारी या खटल्याचा निकाल देत जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या नऊ जणांमध्ये मुख्य आरोपी डल्लू सरदार याच्यासह, गोल्डी सरदार ऊर्फ कुलजितसिंग मुलतानी, मनमितसिंग ऊर्फ सन्नी दिगवा, छोटू ऊर्फ संदीपसिंग जोहर, बबलू ऊर्फ मोहरोज हुसैन पठाण, रवींद्रसिंग ऊर्फ बंटी ऊर्फ लंगड्या आनंद, पप्पू गजानन झाडे, विनोद रामराव पंचाग आणि आकाश पुरुषोत्तम माहुरकर यांचा शिक्षा झालेल्या अाराेपींमध्ये समावेश आहे.
इन कॅमेरा सुनावणी
अत्यंतसंवेदनशील अशा या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पोलिसांना बरीच काळजी घ्यावी लागली. न्यायालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यासह अनेकदा आरोपींना मागील दाराने बाहेर काढण्याची काळजी घ्यावी लागली. अनेक आरोपींची न्यायालयातील सुनावणीदेखील इन कॅमेरा झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारी निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
बातम्या आणखी आहेत...