आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडचिरोली-कोटगुलजवळ भुसुरुंग स्फोट, 3 पोलिस जवान जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/अकोला- नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात तीन पोलिस जवान जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी कोटगूल येथील आठवडी बाजाराजवळ घडली. सोनल खेवले, सुरेश गावडे व विकास धात्रक अशी जखमी जवानांची नावे आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, नक्षल विरोधी अभियानाच्या विशेष अभियान पथकाचे जवान आज कोटगूल पोलिस मदत केंद्रांतर्गतच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी जात होते. कोटगूल-सोनपूर रस्त्यावर आश्रमशाळेजवळ भरणाऱ्या आठवडी बाजारानंतर काही अंतरावर  
नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडवून आणला. यात सोनल खेवले, सुरेश गावडे व विकास धात्रक हे तीन जवान जखमी झाले. त्यापैकी सोनल खेवले व सुरेश गावडे यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आल्याचे समजते. या आठवड्यात नक्षली कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत नक्षल्यांनी तीन नागरिकांची हत्या केली, तर आज भूसुरुंगस्फोट घडवून आणला.

बातम्या आणखी आहेत...