आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: कर्जमाफीच्‍या अर्जासाठी बहुतांश सेतू केंद्रांवर उसळली मोठी गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कर्जमाफीचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टे. अाहे. परंतु, अजुनही तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन असणे, अवेळी होणारे लोडशेडिंग यामुळे अनेकांना अर्जच सादर करता आले नाही. त्यामुळे आदल्या दिवशी १४ सप्टेंबर रोजी शहरासह जिल्ह्यातील बहुतेक सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी चांगलीच गर्दी उसळली. गर्दी बघता आॅनलाईन अर्ज भरणे शक्य नसल्यामुळे आॅफलाईन अर्ज स्विकारण्यात आले. नंतर ते भरले जाणार आहेत. 
 
वारंवार प्रयत्न करूनही आॅनलाईन अर्ज प्राणालीसंदर्भातील तांत्रिक अडचणी कायमच आहेत. सर्व्हर डाऊन असणे, लिंक वारंवार फेल होणे, बोटांचे ठसे उमटणे यात कहर म्हणून सुरू झालेले अघोषित लोडशेडींग यामुळे दिवसभरात फारतर पाच ते दहा अर्जच पाठवणे शक्य झाले. कर्जमाफीचे अर्ज भरणाऱ्यांची संख्या लाखोच्या घरात असल्यामुळे अनेकांना चार-चार दिवस ताटकळत राहावे लागले. आता तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली तरी अनेकांचे अर्ज अद्याप भरले गेले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच सेतू केंद्रांवर गर्दी उसळली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्राच्या मुख्य दरवाजावर टेबल लावून तेथेच आॅफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत अर्ज स्विकारणे सुरू होते. 
 
हीच पद्धत जर आधी असती आणि ज्याचा अर्ज आॅनलाईन पाठवायचा आहे त्याचा दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक घेऊन अर्ज भरण्याच्या तारखेला त्याला बोलावले असते तर आम्हाला चार-चार दिवस ताटकळत बसावे लागले नसते. 
 
आज शेवटचा दिवस 
कर्जमाफीसाठी अद्याप ऑनलाईन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. १५) सप्टेंबरला सायंकाळपर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे. नजीकचे संग्राम केंद्र, महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रात जाऊन अर्ज भरावा. अर्जासाठी जन्माचा दाखला, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, आधार एनरोलमेंट पावती, शिधापत्रिका, जन्माचा दाखला नसल्यास विहीत नमुन्यातील प्रतिज्ञालेख, बँकेचे पासबुक झेरॉक्स, कर्ज खाते क्रमांक या कागदपत्रांसह कर्जमाफीचे अर्ज भरावेत.  
 
बातम्या आणखी आहेत...