आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हाट्स अॅप’वर ‘गुड मॉर्निंग’ने होते कार्यकर्त्यांची पहाट; आमिषाला बळी पडू नका, दिला जातोय सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - जिल्हा परिषद पंचयात समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या रंगत येत आहे. यात सध्या सोशल मीडियावर मतदारांना कार्यकर्त्यांकडून विनंतीचे ‘डोज’ पाजल्या जात असल्याचे चित्र व्हाट्स अॅपवर दिसून येत आहे. त्यातच कार्यकर्ता तुटू नये या भीतीने भल्या पहाटे गुड मॉर्निंगच्या संदेशाने पदाधिकारी, कार्यकर्ते नेत्यांची पहाट होत असल्याचे सध्या जोरदार दिसून येत आहे. 

निवडणुका आल्या की आयाराम-गयारामांचे पक्षांतील ‘इनकमिंग आउटगोइंग’ची संख्या ही वाढतच असते. निवडणुकीच्या याच कालावधीत कार्यकर्तांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आमिषांचे डोज पाजले जाते. हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. निवडणुका आल्या की बिअर बार, धाबे हाऊसफुल्ल दिसून येताता. यामध्ये आपला कार्यकर्ता कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, कोरडे ताट सोडून ओल्या पार्टीचे मागे जाऊ नये, यासाठी अगदी प्रेमाने कार्यकर्त्यांची समजूत ही सध्या व्हाट्स अॅपच्या माध्यमातून काढली जात आहे. मतदान ज्याला करायचे आहे त्यांनाच करा पण उगाच डोके फोडून घेऊ नका. दोन दिवस ते तुम्हाला धाब्यावर नेतील. पुन्हा घरचा तांब्या अन घरची ताटलीच तुमच्या पुढे येणार म्हणून कुठल्याही आमिषाला बळी पडू नका योग्य उमेदवाराला मतदान करा, असा मौलिक सल्ला सध्या राजकीय नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून व्हाट्स अप दिला जात आहे. 
 
प्रत्येक मिटींगचे वार्ताकंन आता कार्यकर्ते व्हाट्स अॅपवर करू लागले आहे. आपल्या कार्यकर्त्यांला गुड मॉर्निंग, सुप्रभात, आपला दिवस आनंदाचा जावो असे संदेश टाकून संभाव्य उमेदवारांच्या दिवसाला सुरवात होताना सध्या दिसत आहे. तर आपलीच शिट निवडुन येणार असून फक्त हवेत राहता चांगले काम करा. ताकदिने फिरा. हवेत राहाल तर आपलाच मुखभंग होईल म्हणून गुप्तता पाळा. संयम ठेवा. असेही सल्ले सध्या कार्यकर्ता व्हाटस अॅपच्या माध्यमातून पसरवत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. अद्याप सर्वच पक्षांचे नेमके कोणते उमेदवार रिंगणात असणार असल्याचे निश्चित जरी झाले नसले तरी सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कट्टर कार्यकर्ते दगाबाजी होऊ नये याची पुरेपुर काळजी घेण्यासाठी आधुनिक माध्यमांचा सर्रास वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. 

उमेदवारी मिळण्यासाठी शक्यता नसलेल्या उमेदवाराचे आतापासूनच मतपरिवर्तन करण्यासाठी समजंसपणाची भूमिका पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. नाराजामुळे दगाबाजी होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात असल्याचे चित्र सध्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात निर्माण झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...