आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याने पाडला काळविटाचा फडशा, विद्यापीठ परिसरातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - श्रीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात मार्डी मार्गावरील गेटजवळ बुधवारी सकाळी एक काळवीट मृत अवस्थेत पडून होते. या काळविटाची बिबट्याने शिकार केली असावी, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेने विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे.

मार्डी मार्गावर असलेल्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला लागून मंगळवारी सायंकाळी एक काळवीट मृत अवस्थेत पडून होते. हे काळवीट नागरिकांना दिसल्यामुळे त्यांनी ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाचे पथक घटनास्थळी गेले. दरम्यान, बुधवारी रात्रीदरम्यान मृत काळविटाच्या शरीराचा काही भाग बिबट्याकडून पुन्हा खाण्यात आला. त्यामुळे मंगळवारी असलेल्या काळविटाच्या शरीराचा भागापेक्षा बुधवारी तो कमी झालेला दिसला. याचा अर्थ बिबट्याने बुधवारी पहाटे किंवा मंगळवारी रात्रीदरम्यान हीच शिकार खाल्ली असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिकार झालेली काळवीट मादी असून, तिचे वय अंदाजे ते वर्ष असावेत. बिबटनेच तिची शिकार केल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्षात आले. बिबट्याने काळविटाच्या पोटाचा लचका तोडला आहे. त्या ठिकाणी बिबटचे पगमार्क आढळून अाले आहे.