आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात पावसाची तूट, नागपूर विभागात गंभीर संकटाचे संकेत, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मान्सूनबाबतचे यंदाचे सर्व अंदाज फोल ठरले असून, जुलै महिन्याचा पहिला आठवडा कोरडाच गेल्याने विदर्भात प्रामुख्याने पूर्व विदर्भाच्या पट्ट्यात गंभीर संकटाचे संकेत मिळू लागले आहेत. हमखास पावसाच्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्येदेखील पावसाची मोठी तूट कायम असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. 

जून महिन्याच्या अखेर थोडाफार पाऊस झाल्यावर विदर्भातील अनेक जिल्ह्यात जुलै महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेला आहे. हवामान खात्याच्या मते आणखी काही दिवस तरी जोरदार पावसाचे वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे पुढचा आठवडादेखील कोरडा जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. हवामान खात्याच्या नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या माहितीनुसार, विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जूनपासून आतापर्यंत सर्वसामान्य पावसाच्या प्रमाणाच्या तुलनेत अनुक्रमे ३३ २३ टक्के कमी पाऊस झाला आहे. 

भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात २७ टक्के ते २८ टक्के कमी पावसाची नोंद असून, उपराजधानीच्या नागपूर जिल्ह्यात पावसाची तूट सुमारे १७ टक्के आहे. जुलैपासून जिल्ह्यात केवळ ७१.३ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यात तुलनेने समाधानकारक स्थिती असून, या जिल्ह्यातील पावसाची तूट केवळ टक्के असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पावसाचे प्रमाण ३४ टक्के कमी असून, त्या खालोखाल अकोला जिल्ह्यात १५ टक्के, यवतमाळ बुलडाणा जिल्ह्यात ते टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. 

१३ पर्यंत नाही पाऊस 
हवामानखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलैपर्यंत तरी बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता दिसत नाही. पुढील सहा दिवस पावसाचा कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. सोमवारनंतर काही प्रमाणात वातावरण ढगाळ राहील. 
बातम्या आणखी आहेत...