आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोन्या’चे भाव असूनही संत्र्यावर पावसाअभावी उत्पादकांवर ‘संक्रांत’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सातत्याने मागील पाच वर्षांपासून जबर नुकसान झेलणाऱ्या अल्प उत्पादनामुळे संत्र्याला सुगीचे दिवस आले असताना पावसाअभावी मात्र ६० हजार रुपये प्रति टनाचे भाव सद्या ३५ हजार रुपयांवर आले आहे. त्यामुळे यावर्षीही संत्रा नसल्यामुळे सोन्याचे भाव असताना संत्र्याची पुरेशी वाढ होऊ शकल्याने संत्रा उत्पादकांवर ‘संक्रांत’ आल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. 

अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर संत्र्याच्या बागा असून, सुमारे ५५ हजार हेक्टरवर संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. राज्याच्या तुलनेत सरासरी ७५ टक्के संत्र्यांचे उत्पादन अमरावती जिल्ह्यात होत असून, यात आंबिया बहाराचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, मोर्शी या तालुक्यात आंबिया बहाराचे तर वरूड मोर्शी तालुक्यातील काही भागात मृग बहाराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील तीस वर्षांत या तालुक्यांमध्ये केवळ संत्र्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता येऊ शकली. परंतु मागील पाच वर्षांपासून संत्र्याच्या मागे असलेल्या गारपीट, भरघोस उत्पादन, रोगराई, नसलेले प्रक्रिया उद्योग आदींच्या साडेसातीमुळे संत्र्याने जबर तडाखा दिला. मागील वर्षी संत्र्याला भरघोस उत्पादन असताना सरासरी समाधानकारक ३० ते ३५ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. परंतु ऐन हंगामात नोटाबंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दहा लाखांची बाग दोन लाखांवर विकण्याची वेळ आली. व्यापाऱ्यांनी नोटांच्या टंचाईमुळे व्यवहारही रद्द केले होते. 

दरम्यान, यावर्षी वातावरण अनुकूल नसल्यामुळे जिल्ह्यात आंिबया बहाराची फूट होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी आंबिया बहाराच्या संत्र्याचे नगण्य उत्पादन होणार आहे. देशभरात जिल्ह्यातील आंिबया बहाराच्या संत्र्याला विशेष मागणी राहते. यावर्षी उत्पादन घसरल्यामुळे या महिन्यापासून प्रथमच संत्र्याची खरेदी सुरू झाली आहे. परंतु पावसाचा अभाव अनुकूल वातावरण नसल्यामुळे फळांच्या वाढीवर विपरित परिणाम झाला आहे. अल्प उत्पादनामुळे या महिन्याच्या सुरवातीला संत्र्याचे दर प्रथमच ५० ते ६० हजार रुपये टनावर गेले होते. परंतु पावसाने पाठ फिरवताच पंधरा दिवसात संत्र्याचे दर सध्या सरासरी ३० ते ३५ हजार रुपये टनावर आले आहेत. त्यामुळे आंबिया बहार असलेल्या शेतकऱ्यांनी सध्या संत्र्याची विक्री थांबवली आहे. 

संत्र्याने आणली सुबत्ता
जिल्ह्यातकापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद आदी प्रमुख पिके आहेत. परंतु या पिकांतून फारसा धनलाभ होत नसल्यामुळे मागील तीस वर्षांत बागायत पट्ट्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादनाकडे वळला. इतर पिकांच्या तुलनेत उत्पन्न चांगले मिळत असल्याने बागायत पट्ट्यात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक उंचावली होती. 

हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी
यावर्षीउत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने प्रथमच ऑगस्टमध्ये बागांची खरेदी सुरू झाली आहे. दरवर्षी साधारणत: दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर बागांची विक्री सुरू होत असते. आंिबया बहाराची फळे तोडणीसाठी अद्याप सरासरी दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असताना अचलपूर तालुक्यात भाव दमदार असल्याने शेतकऱ्यांनी बागांची विक्री सुरू केली होती. परंतु सध्या पाऊसच नसल्याने खरेदीदारांनी भाव पाडले अाहे. त्यामुळे पावसाअभावी तेजी असतानाही संत्र्यावर संक्रात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पाऊस आल्यास भावात तेजी शक्यता 
सध्यापाऊसनसल्यामुळे खरेदी मंदावली आहे. परंतु पाऊस आल्यास संत्र्याचे दर सरासरी चार हजार रुपये प्रति हजारांच्यावरच राहण्याची शक्यता आहे.’’ 
- राजेंद्र गोरले, व्यापारी 

पावसाअभावी दर झपाट्याने घसरले 
सध्याकिरकोळबाजारातच संत्र्याची विक्री होत असून पावसाअभावी संत्र्याचे दर ५० हजारावरून ३५ हजारांवर आले आहे. पाऊस आल्यास संत्र्याचे दर तडकण्याची शक्यता आहे.’’ 
- प्रशांत ठाकरे, व्यापारी 

..तर जबर झटका 
यावर्षी जिल्ह्यात कोणत्याच पिकाची अवस्था समाधानकारक नसल्यामुळे संत्रा उत्पादक तालुक्यात शेतकऱ्यांच्या आशा अल्प प्रमाणात असलेल्या संत्र्यावर टिकून आहेत. परंतु पाऊस आल्यास संत्र्याची अवस्था बिकट होऊन गळ वाढणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बागांना पाणी देणे सुरू केले आहे. परंतु यामुळे किमान तात्पुरता दिलासा मिळणार असून फळवाढीसाठी आवश्यक वातावरण नसल्यामुळे जबर झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर पिकांप्रमाणे संत्र्यावर असलेल्या आशाही मावळल्यास गंभीर आर्थिक संकट निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...