नांदगाव खंडेश्वर : ‘सावित्रीबाईफुले यांच्या प्रयत्नांनीच स्त्री शक्ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. शिक्षकांसह मातांनीही मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांना एक उत्तम नागरिक घडवावे,’ असे आवाहन रजिया सुलताना यांनी केले.
तालुक्यातील सालोड कसबा येथील शाहू महाराज विद्यालय श्री वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर अभ्यंकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन. आभाळे, मंगरुळ चव्हाळाचे ठाणेदार गणेश ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रा. राम मोहळे, सतीश इंझळकर, रुपाली इंझळकर यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिनेश मोहोड यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल धुरते, तर आभार दीपाली फुंदे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी केले विविध कार्यक्रमांचे सादरीकरण : यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटक, कविता, पथनाट्य, वेशभूषा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये स्नेहल धुरते, दिव्यानी मुधोळकर, दुर्गा कुले, वैष्णवी तिवसकर, प्रिया नेवारे, रेणुका गायकवाड, आचल इंझळकर, प्रिया माहुलकर, जयश्री तिवसकर, सम्यक साबळे, प्रशिक बसवनाथे, आसमा कादीर, आचल शेळके, आरती चोरे आदींचा समावेश होता.