आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावस भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेप, 1 लाखाचा दंडही ठोठावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वरुड तालुक्यातील पुसला येथे अडीच वर्षांपूर्वी मावस भावाचा खून करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश (क्रमांक २) न्यायालयाने सोमवार, १८ एप्रिल रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच मृतकाच्या पत्नीला नुकसानभरपाईपोटी आरोपीला लाखाचा दंड ठोठावला आहे.
विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंदूरजना घाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुसला येथील रहिवासी मनोहर मरकाम (४०) यांचा २६ ऑक्टोबर २०१३ ला खून झाला होता. हा खून मनोहर मरकाम यांचा मावसभाऊ योगेश नथ्थूसिंग उईके (२८, रा. पुसला) यानेच केला होता. त्यामुळे न्यायालयाने योगेश उईकेला जन्मठेप दंडाची शिक्षा सुनावली आहे. योगेश हा घटनेच्या पूर्वी मनोहर मरकाम यांच्याच घरी राहत होता. दरम्यान, घटनेच्या आदल्या दिवशी योगेश मनोहर यांचे भांडण झाले होते. त्या वेळी मनोहरने योगेशला घरातून हाकलून दिले होते. त्या वेळी योगेश त्याचे कपडे इतर साहित्य घेऊन गेला होता. मात्र, २६ ऑक्टोबरला मध्यरात्री वाजून ४५ मिनिटांदरम्यान मनोहरचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मनोहर यांच्या पत्नी सुनीता, मुली अंकिता अश्विनी या उठून बसल्या. त्या वेळी मनोहर झोपला होता. त्याच्या बाजूलाच योगेश उभा होता त्याच्या हातात चाकू होता. योगेशने मनोहरच्या डोक्यावर चाकूने वार केले होते. ही बाब लक्षात आली त्या वेळी मनोहरच्या पत्नीने मुलींनी योगेशला पकडण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्याने सुनीता त्यांच्या दोन मुलींना पेचकचने मारून जखमी केले होते. दरम्यान, मनोहरचा या हल्ल्यामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी सुनीता मनोहर मरकाम यांनी त्याच दिवशी शेंदूरजना पोलिस ठाण्यात योगेशविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी योगेशविरुद्ध खून हाणामारीचा गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून आवश्यक साहित्य जप्त केले होते. तसेच २३ जानेवारी २०१४ ला प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायालयाने आठ साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या.
महिन्यांच्या शिक्षेनंतर सुरू होईल जन्मठेपेची शिक्षा
मारेकरी योगेशने मनोहर यांचा खून केला तसेच सुनीता, अंकिता अश्विनी यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी मारहाणीचाही गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात कलम ३२४ अन्वये प्रत्येकी महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा योगेशला वेगळी भोगायची असून, प्रत्येकी महिने याप्रमाणे महिने भाेगावी लागेल. ही नऊ महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची जन्मठेपेची शिक्षा सुरू होणार आहे, असेही सरकारी वकील अॅड. संदीप ताम्हणे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...