आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता पित्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्यास जन्मठेप, धोत्रा येथे तीन वर्षांपूर्वी वडिलांचा झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील कुऱ्हा ठाणेअंतर्गतच्या धोत्रा येथील एका मुलाने क्षुल्लक कारणावरून वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. यावेळी पतीला वाचवण्यासाठी पत्नी मधात गेली असता, मुलाने आईवरही वार केले होते. या हल्ल्यात वृद्ध पित्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश (क्र.३) एस. एस. भिष्म यांच्या न्यायालयाने हल्लेखोर मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायालयाने शुक्रवार, ऑक्टोबरला दिला आहे. 
 
गजानन जगन नागोसे (४०, रा. धोत्रा) असे आरोपीचे नाव आहे. गजाननने वडील जगन सिताराम नागोसे (७०) आई लक्ष्मी जगन नागोसे (६५) यांच्यावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात जगन नागोसे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलिस सूत्रांनुसार, २७ मे २०१४ ला सकाळी साडेसहा वाजता बाप लेकांचा किरकोळ वाद झाला. त्यानंतर जगनने कुऱ्हाड घेऊन जगन यांच्या खांद्यावर, गळ्यावर, मानेवर शरीराच्या इतर ठिकाणी गंभीर वार केले. जगन पतीला मारत असल्यामुळे लक्ष्मीबाईंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर आईवर कुऱ्हाड चालवली. यामध्ये लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या होत्या, तर जगन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणाची तक्रार लक्ष्मी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी जगनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपास तत्कालीन ठाणेदार डी. आर. शुक्ला यांनी पूर्ण करून १२ ऑगस्ट २०१४ ला दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणी न्यायालयात सात साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. जगनने खून केल्याचे तसेच आईवरही कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे पुढे आल्यामुळे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...