आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मठेपेचा कैदी नागपुरातून पळाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याने सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन नागपुरातील कारागृहातून पलायन केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पाेलिस त्याचा शाेध घेत अाहेत. श्यामलाल दिनेश सिसवास (वय ४०) असे फरार कैद्याचे नाव आहे. कोल्हापूर कारागृहातून ३१ जानेवारी २०१६ राेजी त्याला नागपुरात स्थानांतरित करण्यात आले होते. सध्या ताे खुल्या कारागृहातच ठेवले होते. 

सोमवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या दरम्यान श्यामलालने सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून पलायन केले. ताे पळाल्याचे लक्षात अाल्यानंतर सुरक्षा रक्षकांची पाचावर धारण बसली. त्यांनी  कारागृह प्रशासनाला याबाबत माहिती दिली. कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसांना सतर्क केले. श्यामलालचा शोध घेण्यासाठी धंतोली पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले.
 
श्यामलालला मुंबई न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. १७ मार्च २००३ रोजी त्याला जन्मठेप ठोठावण्यात आल्यावर मागील काही वर्षे कोल्हापूर कारागृहात ठेवण्यात आले होते. २०१५ मध्ये नागपूर कारागृहाची भिंत अलांडून सहा कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्यातील सर्व कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेचे सुरक्षा अॉडिट करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...