आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधानाच्या सरनाम्याचे वाचन, लिम्का, आशिया रेकॉर्डमध्ये नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - संविधान दिनाच्या औचित्याने नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर सव्वा लाख विद्यार्थ्यांनी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागोमाग विद्यार्थ्यांनी सरनाम्याचा पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांनी केशरी, पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या टोप्या घालत मैदानावर तिरंगा साकारला.
लिम्का, आशिया रेकॉर्डमध्ये नोंद
१.२५ लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्याचा हा विक्रम आहे. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती सुनीता क्षीरसागर-धोटे ( निरीक्षक) यांनी या वेळी दिली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, विद्यार्थ्‍यांच्‍या उपस्‍थितीचे फोटो..