आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, शेंदूरजना खुर्द शिवारातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव- तालुक्यातील शेंदूरजना खुर्द शिवारातील एका शेतामध्ये शनिवारी (दि. ११) सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका नर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शेंदूरजना खुर्द शिवारातील बारभाई जंगलाजवळील गजानन कृष्णराव जगताप यांच्या शेतामध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास एका गुराख्याला बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्याने ही माहिती गावात सांिगतली. शेंदुरजना खुर्द येथील रहिवासी अनिल शेंडे यांनी याची माहिती तळेगाव दशासर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकरी अनंत गावंडे यांच्यासह शेख इकबाल, आर. पी. विधळे, संतोष आखरे, डी. एन. वानखडे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा पंचनामा केला असता, तो नर असून त्याचे अंदाजे वय वर्षे आहे.त्याची लांबी फूट आहे. त्याच्या मानेजवळ छिद्रासारखी जखम दिसून आली. वृत्त लिहिस्तोवर त्याचे शवविच्छेदन व्हायचे होते.
शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे अनंत गावंडे यांनी सांिगतले. बिबट्याचा मृतदेह पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे रहस्य उलगडणार आहे.

शवविच्छेदनानंतर कळेल नेमके कारण
मृत बिबट्याच्या मानेजवळ छर्ऱ्याच्या बंदुकीच्या गाेळीसारखी जखम असल्याने त्याची शिकार करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, परंतु शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...