आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लायसन’साठी आता लागणार ७६४ रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने वाहन परवान्यासह विविध शुल्कांमध्ये तब्बल दुप्पट ते सहापट वाढ केल्याने आता वाहनधारकांना जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ही शुल्कवाढ २९ डिसेंबर २०१६ पासून लागू करण्याचेही आदेश यावेळी दिल्याने आरटीओ विभागाला मागील आठ दिवसांत झालेल्या व्यवहाराच्या नोंदी बाहेर काढून तफावत रक्कम वसूल करावी लागणार आहे. 
 
नवीन वाहन घेतल्यापासून ते वाहनावर कर्जाचा बोझा चढवणे, फिटनेस प्रमाणपत्र घेणे यासह वाहनांशी संबधित प्रत्येक काम आरटीओमध्ये करावे लागते. या सर्व कामांसाठी लागणाऱ्या शासकिय शुल्कात भरीव वाढ झालेली आहे. पुर्वी दुचाकी चालविण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन)अवघ्या ३१ रुपयात निघायची त्यासाठी आता २०१ रुपये मोजावे लागणार आहेत. ही शुल्कवाढ २९ डिसेंबर २०१६ पासून लागू करण्याचे आदेश आल्यामुळे २९ डिसेंबर २०१६ नंतर ज्यांनी जुन्या शुल्कदरात काम केले आहे, त्यांना वाढीव शुल्कदारातील तफावत आरअीओमध्ये जाऊन भरणा करावी लागणार आहे. अशा वाहनमालकाला आरटीओकडून पत्रसुध्दा पाठवण्यात येणार आहे. 
 
वाहनमालकांनापत्र देणार: सुधारितशुल्क लागू करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यामुळे २९ डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत झालेल्या व्यवहाराचे तफावत शुल्क भरण्यासाठी वाहनमालकांना आम्ही पत्र पाठवणार असल्याचे आरटीओ श्रीपाद वाडेकर यांनी सांिगतले.
 
आरटीओ कार्यालयात अशी आहे शुल्कवाढ 

कामाचे स्वरुप  पुर्वीचे शुल्क  वाढीव शुल्क 
१) लर्निंग लायसन ३१ २०१ 
२) परमनन्ट लायसन ३१३ ७६४ 
३) नविन वाहन नोंदणी 
दुचाकी ६० ३०० 
कार २०० ६०० 
तिनचाकी ३०० १००० 
मालवाहू मध्यम वाहन ४०० १००० 
ट्रक/ बस ६०० १५०० 
४) वाहन ट्रान्सफर ३० १५० 
५) कर्जाचा बोझा चढवणे 
दुचाकी १०० ५०० 
कार १०० १५०० 
बस/ ट्रक १०० ३००० 
६) फिटनेस प्रमाणपत्र ३०० ६०० 
बातम्या आणखी आहेत...