आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधीच ऑक्टोबर हिट; त्यात मानगुटीवर भारनियमनाचे भूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सद्य स्थितीत ऑक्टोबर हिटमुळे उन्हाळ्यापेक्षा जास्त उकाडा आहे. त्यामुळे पंखे, कुलरशिवाय घरात थांबणे असह्य होत असतानाच कोळशाची कमतरता असल्याचे सांगून महावितरणने दररोज पाच ते आठ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. या भारनियमनामुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत. 
 
महावितरणच्या माहितीनुसार, ऑक्टोबरला राज्यात १७ हजार ८०० मेगावॅटपर्यंत विजेची मागणी पोहोचली होती. त्या तुलनेत मात्र महावितरणकडे १५ हजार ७०० मेगावॅटच वीज उपलब्ध आहे. शुक्रवारी वीज तुटवडा हजार १०० मेगावॅटच्या घरात पोहोचला आहे. वीज निर्मिती केंद्रांना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्यामुळे वीज निर्मितीमध्ये घट आल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले. त्यामुळेच मागील तीन दिवसांपासून शहरात ग्रुपपासून ते जी ग्रुपपर्यंत म्हणजेच संपूर्ण शहर भारनियमनाच्या विळख्यात सापडले. सद्या भारनियमन सकाळी सायंकाळी असे दोन टप्प्यात सुरू आहे. महावितरणकडून तात्पुरते भारनियमन असल्याचे सांगण्यात आले असले, तरी आगामी चार ते पाच दिवस हे भारनियमन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वीज निर्मिती कमी यातच ऑक्टोबर हिटमुळे पिकांनाही पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे कृषी पंपासाठी लागणाऱ्या विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे नागरी वस्तीतही भारनियमन करावे लागत आहे. मागील पाच ते सहा वर्षांतही ऑक्टोबरमध्ये दिवसाला पाच ते आठ तास भारनियमन झाले नव्हते. 

कोळसा कमी असल्यामुळे तूट 
वीजनिर्मितीकेंद्रांना कोळसा कमी असल्यामुळे वीज निर्मिती कमी होत आहे. तसेच कृषी पंपांना लागणाऱ्या विजेतही वाढ झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सर्वच ग्रुपवर भारनियमन सुरू आहे. आगामी चार ते पाच किंवा त्यापेक्षा अधिक दिवस भारनियमन होण्याची शक्यता आहे. 
सुहास मेत्रे, अधीक्षक अभियंता, महावितरण, अमरावती. 
बातम्या आणखी आहेत...