आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच पक्षांचे ध्येय एकच पंचायत समितीचे सभापतीपद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - येथील पंचायत समितीचे सभापतीपद या वेळी ओबीसीसाठी राखीव असल्याने रामतिर्थ, खल्लार, गायवाडी, शिंगणापूर नविन लेहेगांव गणातील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 
 
दर्यापूर तालुक्यात आठ पंचायत समिती गण आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर बहुतांश राजकारण्यांनी सभापतीपदावर नजर ठेवून व्यूव्हरचना सुरू केली असून, येवदा , पिंपळोद, वडनेरगंगाई या अनुसुचित जाती-जमाती राखीव गणात ईच्छूकांची संख्या म्हणावी तशी राहणार नाही असे चित्र आहे. दर्यापूर तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण हे अोबीसी प्रवर्गातील पुरूष अथवा महिलेसाठी राखीव झाले आहे. आठ पंचायत समिती गणापैकी खल्लार- नागरिकांचा मागास प्रवर्ग, रामतीर्थ - ना. मा. प्र. महिला, लेहेगांव - सर्वसाधारण महिला शिंगणापूर-गायवाडी - सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. 
 
इतर तीन गणातील इच्छूक उमेदवारांनी आरक्षणानंतर जवळपास माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याठिकाणी आता नव्याने उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षांना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे सभापतीपदाचे आरक्षण अोबीसीसाठी आरक्षीत झाल्याने जिल्हा परिषदेची हौस पंचायत समितीवर भागवू म्हणत आपला मोर्चा पंचायत समिती गणाकडे वळवला. त्यामुळे तालुक्यात राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभापतीपदावर नजर ठेवत उमेदवारी मिळण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेनेकडे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छूकांची प्रचंड गर्दी आहे. सद्यस्थितीत पंचायत समितीवर शिवसेना ३, राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं आघाडीच्या प्रत्येकी उमेदवारांच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. सभापतीपदी रेखा वाकपांजर तर उपसभापती म्हणून संजय देशमुख विरजमान आहेत. ते फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी असूनीन ते चार दिवसात राजकीय पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करणार असून, कोणाला तिकीट मिळले वा कटेल याबाबत इच्छूकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून आहे. 
 
आमदार भारसाकळे, बुंदीलेंसाठी राजकीय परीक्षा 
नुकत्याचा पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत सत्तेची सूत्रे भाजपला मिळाली. तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइंचे वर्चस्व असून, सद्याचे चित्र पाहता आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रमेश बुंदीले यांच्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक राजकीय परीक्षा ठरणार आहे. आजवर भाजपला ग्रामीण भागात नेतृत्वाची संधी मिळाली नसून जातीय समिकरण बघता भाजप विजयश्री खेचून आणार का असे चित्र आगामी काळात निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...