आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोको पायलटची आत्महत्या, अमरावतीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील गोपालनगर भागातील मराठा कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ४२ वर्षीय सहायक लोको पायलटने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी घडली. महेंद्र पांडुरंगजी भांडे (४२ रा. साईकृपा अपार्टमेंट, मराठा कॉलनी) असे मृतकाचे नाव आहे. महेंद्र यांनी आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

महेंद्र भांडे हे रेल्वेमध्ये सहायक लोको पायलट पदावर कार्यरत होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची पोस्टिंग नागपूरला होती. दरम्यान, सध्या त्यांचे भुसावळ येथे प्रशिक्षण सुरू होते. सदर प्रशिक्षण एक महिन्याचे असून, या प्रशिक्षणाचे अद्याप सात दिवस बाकीच होते. बुधवारी महेंद्र भांडे हे भुसावळवरून अमरावतीत घरी आले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी त्यांचा परिवार घरीच होता. पत्नी घरातच स्वयंपाक करत होत्या. त्याच वेळी भांडे यांनी बेडरूमच्या खिडकीला दोरी अडकवून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना सकाळी ११.३० वाजता प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच वर्ष वर्षाचे मुले आहेत. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...