आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीवरील अत्याचार प्रकरणी लोणीत बंदला प्रतिसाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड - तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाण्यांतर्गतच्या एका गावातील २० वर्षीय युवती महाविद्यालयातून परत येत असताना एका परिचित युवकासह त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर अत्याचार करून तिला वाहनातून खाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी जयेश काळे, अनिकेत मालपे, राहुल चोबितकर यांना अटक केली होती. या घटनेत पोलिस आरोपींना अभय देत असल्याचा आरोप करत या घटनेचा निषेध म्हणून लोणीवासीयांनी शनिवारी बाजारपेठा बंद ठेवून बंद पाळला. 

 

१५ नोव्हेंबरला २० वर्षीय युवती महाविद्यालयातून घरी येत असताना परिचित असलेल्या जयेश काळे याच्यासह त्याचे दोन मित्र अनिकेत मालपे राहुल चोबितकर या युवकांनी युवतीवर वाहनात अत्याचार करून तिला गाडीतून बाहेर फेकले होते. या युवतीवर नागपूर येथे उपचार सुरू होते. तिने ऑटोतून पडून जखमी झाल्याची माहिती नातेवाइकांना दिली. तिच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध कारवाई केली होती. मात्र, या युवतीने २८ नोव्हेंबरला तीन युवकांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार बेनोडा पोलिसात दिली होती. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक केली होती. डिसेंबर रोजी तिन्ही आरोपींची जामिनावर सुटका झाली. दरम्यान या प्रकरणात पोलिस दिरंगाई करत असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलिसांनी या घटनेत लक्ष देऊन आरोपींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी बाजारपेठ दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...