आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने लुटले, 35 ग्रॅमच्या दागिन्यांसह मोबाईलचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील समर्थ हायस्कूलच्या बस थांब्याजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेले एक ६५ वर्षीय व्यक्ती थकल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी दोन व्यक्ती त्यांच्या जवळ आले आम्ही पोलिस असल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी वृद्धाच्या अंगावर असलेले दागिने काढून ठेवण्याची सल्ला दिली. हेच दागिने घेवून भामटे पसार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २१) सकाळी नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.

रमेश रामनारायणजी सोनी (६५, रा. नवाथे प्लॉट, गल्ली क्रमांक १) यांचेच दागिने भामट्यांनी लंपास केले आहे. सोनी हे शुक्रवारी सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घरुन बाहेर पडले. घरी परत येत असतांना थकल्यामुळे ते एका ठिकाणी बसले. त्याचवेळी दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आले, आम्ही पोलिस आहोत, काल एका दुकानात चोरी झाली, दोन लाखांचा माल चोरीला गेला आहे. चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तातडीने गळ्यातील सोनसाखळी हातातील अंगठी काढून ठेवा असे सांगितले. त्यामुळे सोनी यांनी सोनसाखळी अंगठी रुमालात बांधून ठेवले, सदर रुमाल भामट्यांनी सोनी यांच्या हातात दिला. सोनी यांनी घरी आल्यावर रुमाल पाहीला असता त्यात काहीही नव्हते. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच सोनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...