आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व विदर्भात 38,089 हेक्टरवर नुकसान, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात आलेला पाऊस शेतीसाठी वरदान ठरतो. पण अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतीचे नुकसान होते. या पावसामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होते. २०१६ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात ३८,०८९.३७ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक २१,७१६.३७ हेक्टरचे नुकसान एकट्या नागपूर जिल्ह्यांत झाले. या पावसामुळे विभागात ५१.३७७६ कोटींचे पीक नुकसान झाले. शासनाच्या नोंदीत अपेक्षित अनुदानामध्ये उपरोक्त रकमेचे नुकसान झाले असून उपरोक्त अनुदान अपेक्षित असल्याचे नोंदवले आहे. 

फेब्रुवारी २७ ते मार्च दरम्यान झालेला अवकाळी पाऊस आणि जुलै ते आॅक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भात ३८,०८९.३७ हेक्टरमधील शेती पिकांचे नुकसान झाले. विभागतील ६७,५५० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागविलेल्या माहितीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी ३१,४६,८७,४८० कोटींचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे. नागपूर खालोखाल वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. 

या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पूर्व विदर्भातील प्रामुख्याने नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा तसेच विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...