आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 काेटीच्या खंडणीसाठी हत्या; नागपूरातील व्यापाऱ्याच्या मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भातील सर्वात मोठे लॉटरी व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणारे सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुल (वय ३६) याचे खंडणीसाठी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. राहुलचा मृतदेह बुधवारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत बुटीबोरी परिसरात आढळून आला.  

 
शहरातील सेंट्रल अॅव्हेन्यूवर दारोडकर चौक येथे आग्रेकर कुटुंबाचे घर आहे. मंगळवारी सकाळी घराबाहेर पडला. काही अंतरावर तो एका वाहनात बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. राहुल दुपारपर्यंत घरी न परतल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्याच दरम्यान दुपारच्या सुमारास राहुलचा मोठा भाऊ जयेश याला अपहरणकर्त्यांचा फोन आला. राहुलचे अपहरण केले असून त्याला सुखरूप सोडायचे असल्यास १ कोटी रुपये लागतील, असे त्याला सांगण्यात आले हाेते. मात्र पुढील काही निर्णय घेण्यापूर्वीच राहुलचा मृतदेहच कुटुंबीयांना मिळाला.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...