आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला विरोध असल्याने युगुलाची नागपुरात आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असल्याने एका प्रेमीयुगुलाने  घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरातील लकडगंज भागात शुक्रवारी उघडकीस आली.  दीपिका दिलीप सिंग (१८) आणि सोनू हबीब शेख (२१) अशी मृतांची नावे आहेत.
 
दीपिका ही आईसोबत लकडगंज भागात किरायाच्या खोलीत राहत होती, तर सोनू हा सुभाष नगर परिसरात राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, दीपिकाच्या आईचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. बुधवारी रात्री दोघेही जेवण्यासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर शेजारच्या खोलीत जाऊन झोपले होते. सकाळी ते न उठल्याने दीपिकाच्या आईने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला.  मात्र, आतून काहीही प्रतिसाद न आल्याने आईने याबाबत घरमालकाला माहिती दिली. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता दोघांचे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत  मृतदेह आढळून आले. 
 
बातम्या आणखी आहेत...