आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता उपभोगासाठी नव्हे, तर सेवेसाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - भाजपने सत्ता उपभोगण्यासाठी मिळवली नाही तर त्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सत्तेत आलो आहो. त्याचसाठी लाल दिवा मुख्यमंत्र्यांनी दिला असून एक नव्हे तर तब्बल पाच खात्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ती जबाबदारी पार पडण्यासाठी मला सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.आहे, असे मत नवनियुक्त राज्यमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच शहरात आगमनानिमित्त झालेल्या जंगी सत्काराला उत्तर देताना ना. येरावार बोलत होते.
ना. मदन येरावार यांनी शुक्रवारी मुंबईत राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर रविवारी दि. १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यात प्रथम त्यांनी जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या कळंब येथील चिंतामणीचे दर्शन घेतले. त्यानंतर कळंब शहरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा ताफा यवतमाळ शहरात दाखल झाला. यावेळी कळंब बायपास येथे जमलेल्या शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच कळंब चौक येथे मुस्लिम बांधवांकडून भव्य स्वागत करण्यात आले. शारदा चौकात त्यांची पेढेतुला तर शनि मंदिर चौक येथे ना. येरावार यांची लाडुतुला करुन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तहसील चौकात भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नेताजी चौक येथे भाजयुमोच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मदन येरावार यांचे स्वागत केले. या ठिकाणावरुन निघालेला राज्यमंत्र्यांचा ताफा बसस्थानक चौकात आला. त्या ठिकाणी पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ना. मदन येरावार यांनी माल्यार्पण केले. या ठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी त्यांचे स्वागत केले. दत्त चौकात दर्शन घेतल्यानंतर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यासोबतच विविध व्यापारी संघटना आणि इतर संघटना यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दवा बाजार चौकातही आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बापूजी अणे महिला महाविद्यालयात एकत्र आले. या ठिकाणी आमदार मदन येरावार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करत आता आपली जबाबदारी वाढली असून नव्या जोमाने कामाला लागा असा संदेश दिला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे, आमदार राजू तोडसाम, उपाध्यक्ष मनोज इंगोले, प्रवीण प्रजापती, सरचिटणीस अमर दिनकर, अमोल ढोणे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष विजय खडसे, विजय कोटेजा, बंटी जयस्वाल, प्रशांत यादव, दत्ता रहाणे, अजय खोंड, रेखा कोठेकर, ज्योती मानमोडे, माया शेरे, कीर्ती राऊत, अजय बिहाडे, अजय राऊत, दिनेश चिंडाले, अंकुश डोळे, अंकुश बघमारे, देवा राऊत, शैलेश डालवाला, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

भरपावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह : ना.मदन येरावार यांचे शहरात आगमन झाले त्यावेळी सर्वत्र पाऊस सुरू होता. मात्र या पावसातही त्यांच्या स्वागतासाठी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते चौकाचौकात वाट पाहत होते. कळंब बायपास येथेही मोठ्या संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यावरुन भर पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

कुटुंबाकडून स्वागत: हासर्व स्वागताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मदन येरावार त्यांच्या पत्नीसह घरी आले. यावेळी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र त्यांचे स्वागत केले.

कळंबच्या चिंतामणीचे घेतले मदन येरावार यांनी दर्शन
ना. मदन येरावार यांनी जिल्ह्यात प्रवेश करताच सर्वप्रथम सपत्नीक कळंब येथील चिंतामणीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते यवतमाळसाठी निघाले. शहरातही त्यांनी शनी मंदिर आणि दत्त मंदिरात दर्शन घेतले. त्यासोबतच बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

हा यवतमाळच्या नागरिकांचा विश्वासाचा सन्मान
^भाजपचे पाच आमदार असल्याने जिल्ह्याला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल हा भाजप पदाधिकाऱ्यांसोबतच यवतमाळकरांचाही विश्वास होता. त्यामुळे मला मिळालेले राज्यमंत्रीपद हे यवतमाळकरांच्या विश्वासाचा सन्मान आहे. त्यामुळे हा सन्मान असाच कायम ठेवता यावा यासाठी मी प्रयत्न करीन, जनतेची सेवेसाठी झटणार आहे. '' मदन येरावार, राज्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...