आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?\': मधुर भांडारकर यांचे ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- 'आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?' असा थेट सवाल मधुर भांडारकर यांनी ट्विट करत राहुल गांधींना विचारला आहे. भांडारकर यांनी आज नागपुरात इंदु सरकार चित्रपटाबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे ही पत्रकार परिषद भांडारकर यांना रद्द करावी लागली. त्यानंतर नाराज झालेल्या भांडारकर यांनी ट्विट करत थेट राहुल गांधी यांना जाब विचारला. मी आणि माझे कलाकार घाबरले आहेत, आम्हाला धमकी दिली जात आहे, तुम्ही एका चित्रपटाने का घाबरता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भांडारकर ट्विटमध्ये म्हणतात, 'डिअर राहुल गांधी, पुण्यानंतर आज मला नागपुरात आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद रद्द करावी लागली आहे. तुमची या गुंडगिरीला मान्यता आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की, नाही?'

भांडाकर यांनी नागपुरातील पोर्टो हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या पवित्र्यामुळे भांडारकर यांना आपली पत्रकार परिषद कद्द करावी लागली. 
बातम्या आणखी आहेत...