आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला हुलकावणी देत भांडारकरचा संवाद; अखेर विमानतळावर पत्रकारांना बाेलले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘इंदू सरकार’ या अागामी चित्रपटावरून वादाच्या भाेवऱ्यात सापडलेला बाॅलीवूडचा दिग्दर्शक मधुर भांडारकर याला पुण्यापाठाेपाठ रविवारी नागपुरातही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राेषाचा सामना करावा लागला. काँग्रेस कार्यकर्ते सतत त्याच्या मागावर असल्यामुळे भांडारकरला नियाेजित पत्रकार परिषदही रद्द करावी लागली. मात्र अखेर सायंकाळी नाट्यमयरीत्या विमानतळावर अवतरत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी घाईघाईनेच संवाद साधला. हा चित्रपट ‘अाणीबाणी’वर अाधारित असल्याचा काँग्रेसचा दावा अाहे. मात्र भांडारकर यांनी ताे काल्पनिक असल्याचे स्पष्टीकरण दिले अाहे.  

भांडारकर म्हणाले की, ‘अापण राहुल गांधींना टि्वट करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये,’ असे आवाहन केले अाहे. केवळ तीन मिनिटांच्या ट्रेलरवरून संपूर्ण चित्रपटाची कल्पना येऊ शकत नाही. त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी संपूर्ण चित्रपट पाहावा. ‘इंदू सरकार’ हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक आणि केवळ ३० टक्के वास्तवावर आधारित आहे. मग काँग्रेसजन इतके कशाला घाबरत आहेत, असा सवाल भांडारकर यांनी केला. हा चित्रपट भाजप प्रायोजित नाही, असे भांडारकर यांनी स्पष्ट केले. सेन्साॅरने १७-१० कट्स सुचवले आहेत. त्याविरोधात मी अपील करणार आहे,’ असेही ते म्हणाले.  

प्रदर्शित हाेऊ देणार नाही : ठाकरे 
‘इंदू सरकार’ हा चित्रपट आधी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दाखविण्यात यावा. त्यांनी संमती दिल्यानंतर ताे प्रदर्शित करण्यास आमचा विरोध राहणार नाही. मात्र तसे न केल्यास आम्ही महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काॅंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...