आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुख्‍यमंत्र्यांच्‍या शहरात सरकारच्‍या नाकाखाली टिच्चून \'छमछम\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या शहरात सध्‍या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्‍यामुळे सरकारचा ताफा नागपूरात आहे. विधानभवनापासून केवळ 2 किलोमीटरवर अंतरावर बारबालांची छमछम सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. येथील सेंट्रल अॅव्हेन्यूवरील मदिरालयावर छापा टाकून पोलिसांनी बार मालकासह चार जणांना अटक केली आहे. महागडी रक्‍कम मोजून मुंबई आणि बाहेरूनही बारबाला नागपूरमध्‍ये बोलावण्‍यात येत आहेत.
नागपूर शहर व परिसरातील बार मालक पोलिसांशी हातमिळवणी करून डान्‍सबार चालवत असल्‍याचा आरोप होत आहे. डान्‍सबारमध्‍ये पैशांच्‍या पावसात रात्री उशीरापर्यंत बारबालांची छमछम सुरू असते. रविवारी रात्री सेंट्रल अॅव्हेन्यूवरील मदिरालयात डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांना मिळाली. त्यांनी त्‍वरित गणेशपेठ पोलिसांना सोबत घेऊन या मदिरालयावर छापा टाकला. या कारवाईत चार जणांना अटक करण्‍यात आली आहे. नागपूरात अधिवेशन सुरू असताना अशी घटना उघडकीस आल्‍यामुळे छमछम हा चर्चेचा विषय ठरत आहे.
24 तासांच्‍या आत कारवाई करा
24 तासांच्‍या आत कारवाई करा असे सांगत शासनाने पोलिस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्‍यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरु आहेत. त्यांच्यावरही कारवाई होणार असल्‍याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, डान्‍सबारमधील फोटो..