आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांच्या स्फोटात कमांडो शहीद, 19 जखमी; गडचिरोली जिल्ह्यात हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात हेमलकसा प्रकल्पाजवळ बुधवारी सायंकाळी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात सी-६० पथकाचा कमांडो शहीद झाला, तर १९ कमांडो जखमी झाले. सुरेश लिंगा तेलामी (वय २७) असे शहीद जवानाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील रहिवासी होता. गंभीर जखमी जवानांना हेलिकॉप्टरने नागपुरात उपचारासाठी आणण्यात आले असून त्यापैकी पोलिस उपनिरीक्षक दीपक मांडवलकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी भामरागड परिसरात काेम्बिंग अाॅपरेशन सुरू केले अाहे.   
 
भामरागड तालुक्यातील कोपर्सी आणि पुलनारच्या दुर्गम जंगलात बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत  टी. गुनिया (सीआरपीएफ जवान), गिरिधर तुलावी व विजयसिंह ठाकूर हे तिघे किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर अहेरी व भामरागड येथून सी-६० पथकाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली होती. या पथकाने जखमी जवानांना रायपूरला रवाना केल्यानंतर ते दोन भूसुरुंगप्रतिबंधक वाहनांमधून परत येत असताना नक्षलींनी हे वाहन उडवले.       
 
भूसुरुंग प्रतिबंधक २० फूट उडाले : भूसुरुंग स्फोटाच्या प्रभावामुळे सी-६० पथकाचे भूसुरुंग स्फोट प्रतिबंधक वाहन तब्बल २० फूट उंच उडून जमिनीवर आदळले. त्यामुळे वाहनाचे दरवाजे लॉक झाले होते. बहुतांश जवानांना पाय आणि कंबरेला जबर दुखापत झाली. दोघा जवानांनी वाहनाच्या खिडकीतून कसेबसे बाहेर येत लॉक झालेले दरवाजे उघडले व सहकाऱ्यांना बाहेर काढून नक्षलवाद्यांशी सामना केला. या घटनेनंतर दोन तास नक्षलवादी आणि जखमी जवानांमध्ये धुमश्चक्री सुरू होती.    भूसुरुंग स्फोटासाठी नक्षलवाद्यांनी अतिशय शक्तिशाली आयएडी (इम्प्रोव्हाइज एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस)चा वापर केला. त्यात अंदाजे ३० ते ४० किलो स्फोटकांचा वापर केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 
 
जखमी जवानांची नावे 
1) पीएसआय दिपक मंडवाळकर
2) प्रकाश कानके 
3) राजू करंगा 
4) प्रितम बरसागडे 
5) जितेंद्र कोरेती 
6) सावन मातेती 
7) गजानन पनेम 
8) मनाहेर पेंडम 
9) चिन्‍ना करंगा 
10) आयलू पोडाडी 
11) सचिन आडे 
12) रेनू तिम्‍मार 
13) बिरजू धुर्वा 
14) अतूल येलगोपवार
15) केशव परसे 
16) नामदेव बोगामी 
17) विध्‍यात दहादुला 
18) सतिश कुशमाहाका 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...