आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : कुस्‍तीपूर्वी 2 पैलवान उत्‍तेजक इंजेक्शन घेताना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपुरात मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्‍या पहिल्‍याच दिवशी डोपिंगचे प्रकरण समोर आले आहे. दोन कुस्तीगिरांना उत्तेजकांची इंजेक्शन्स घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्‍हणजे स्‍पर्धेच्‍या उद्घाटनापूर्वीच हा प्रकार समोर आला आहे. या कुस्‍तीगिरांकडून इंजेक्शन ताब्‍यात घेण्‍यात आले आहेत.
उद्धाटनाचा कार्यक्रम होण्‍याआधीच हा प्रकार समोर आल्‍याने महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेला गालबोट लागल्‍याचे बोलले जात आहे् आयोजन समितीचे सदस्य दीपक खिवरकर यांनी त्या पैलवानांकडून इंजेक्शन्स ताब्यात घेऊन ही बाब पंच समितीच्या निदर्शनास आणली. स्पर्धेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे संघ नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी 100 पंचही नागपूरात पोहोचले आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून सुरुवात
- मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून नागपुरात सुरुवात होत आहे.
- 59 व्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी राज्‍यातील पैलवान एकमेकांशी झुंजण्यास सज्ज आहेत.
- महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्‍या वतीने ही स्‍पर्धा घेण्‍यात येत आहे.
- 6 ते 10 जानेवारी या कालावधीत ही महाराष्ट्र केसरी कुस्ती होणार आहे.
उत्‍तेजकांमुळे किडनी आणि यकृताला धोका
स्‍टॅमिना आणि शक्‍ती वाढवण्‍यासाठी पैलवान कुस्‍तीच्‍या वेळी उत्‍तेजकांची इंजेक्शन्‍स घेतात. पण हे इंजेक्शन्‍स आरोग्‍यास अपायकारक असतात. उत्तेजकांच्या सेवनामुळे पैलवानांच्या किडनी आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे या इंजेक्शन्‍सवर बंदी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा..,
चंद्रपूर दारूबंदीविरोधातील 6 याचिका फेटाळल्या...
सनातनचे पुनाळेकर यांना अटक करा- राष्ट्रवादीचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र...