आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र केसरी: किताबाची आज रंगणार झुंज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जळगावचा गतविजेता विजय चौधरी व सोलापूरचा बाला रफिक यांच्यात माती विभागात अंतिम लढत रविवारी सकाळी होईल. त्यानंतर गादी गटात पुण्याचा महेश मोहोळ अन् विक्रांत जाधव यांच्यात निर्णायक लढत होईल. या दोन्ही लढतींचे विजेते मल्ल केसरी किताबासाठी सायंकाळी झुंज देतील.

विजय चौधरी व साताऱ्याचा किरण भगत उपांत्य लढत वादग्रस्त ठरली. विजय चौधरी डाव मारीत असताना त्याचा पाय हा कठड्याला लागल्याचा आक्षेप घेत किरणच्या प्रशिक्षकाने लाल कापड मातीवर भिरकावले. त्या वेळी दोन्ही मल्ल ४-४ गुणांनी बरोबरीत होते. लढत चुरशीची सुरू असताना विजयला आणखी एक गुण बहाल करण्यात आला. यावर किरणच्या प्रशिक्षकाने आक्षेप घेतला. सरपंच हनुमंत गायकवाड, प्रमुख पंच मारुती सातव, पंच दत्ता माने, वेळाधिकारी डाॅ. मेघराज कोचर यांनी चित्रफीत बघितल्यानंतर अंतिम गुणाच्या वेळी चौधरीचा पाय कठड्याला स्पर्शून परत मागे गेल्याचे िदसले. त्यामुळे हा गुण वैध ठरवण्यात आला. आॅलिम्पिक नियमानुसार जर कुस्तीपटूचा पाय कठड्याच्या पूर्ण बाहेर गेला असेल तरच तो गुण ग्राह्य धरला जात नाही. या नियमाचा आधार घेत विजय चौधरीने िकरण भगतला ५-४ गुणाने पराभूत करून अंतिम फेरीत धडक िदली.

महेशची राहुलवर मात
महाराष्ट्र केसरी गादी गटातील उपांत्य सामन्यात पुण्याच्या महेश मोहोळने पुण्याच्याच राहुल ठाणेकरचा ५-३ ने चुरशीच्या लढतीत पराभव केला. यानंतर समर्थकांनी डिवचल्यामुळे हाणामारीही झाली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई पूर्वच्या विक्रांत जाधवने सोलापूरच्या समाधान पाटीलला चीतपट करून १०-० ने विजय िमळवून निर्णायक फेरी गाठली.
नगरचा संताेष विजयी
९७ िकलो गादी गटातील अंतिम चारच्या सामन्यात अहमदनगरच्या संतोष गायकवाडने मंुबई पश्चिमच्या संग्राम पाटीलला २-२ गुणांनी बरोबरीत रोखले. मात्र, एकाच वेळी दोन गुण घेतल्यामुळे तसेच संग्रामने एक-एक गुण घेतल्यामुळे तांत्रिक गुणाच्या अाधारे संतोषला विजयी घोषित करण्यात आले. अन्य लढतीत नांदेडच्या विक्रम वडनिलेने लातूरच्या शैलेश शेळकेला ४-४ गुणांनी बरोबरीत रोखले होते.

रमेश कुकडेचा अफलातून डाव
७० किलो गादी प्रकारात सोलापूरचा अमित खांडेकर आणि नाशिकचा रमेश कुकडे या दोन तुल्यबळ कुस्तीपटूंमधील लढत रंगतदार ठरली. रमेश कुकडेने अफलातून डाव मारून अमित खांडेकरला धूळ चारली अन् लढत जिंकली. त्याचप्रमाणे अनिरुद्ध पाटील व सोलापूरचा प्रकाश नरुटे यांच्यातील उपउपांत्यपूर्व फेरीची लढतही प्रेक्षणीय होती.

उत्कर्ष, कांती अंतिम फेरीत
माती विभागातील ६१ िकलो वजन गटात पुण्याच्या उत्कर्ष कोने कोल्हापूरच्या माणिक कराळेला चीत करून अंतिम फेरीत मजल मारली, तर कोल्हापूरच्या कांतीकुमार पाटीलने सोलापूरच्या आकाश आसवलेला १०-० गुणांनी नमवून निर्णायक लढतीत प्रवेश केला हाेता.

जेतेपदाचा प्रबळ दावेदार विक्रांत जाधव!
यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण, अशी उत्सुकता राज्यभरातील कुस्तीप्रेमींना लागली आहे. तिसऱ्या िदवशी सायंकाळपर्यंत नागपुरातील चिटणीस पार्क मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बहुतेक गटांच्या अंतिम लढती ठरल्या. त्याआधारे तसेच या तीन िदवसांतील िदग्गज मल्लांची कामगिरी बघून कुस्ती तज्ज्ञांमध्ये सोलापूरचा दणकट कुस्तीपटू विक्रांत जाधव याला केसरी किताबाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. विक्रांत जाधव सध्या फाॅर्मात अाहे. त्याने गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी जळगावच्या विजय चौधरीला वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत १०-० गुणांनी चीतपट केले. त्यामुळे यंदा तज्ज्ञांच्या मते विजय चौधरीच्या संधी ७० टक्के आहेत. केसरी पदासाठी पुणे शहराचा गादी विभागातील महेश मोहोड अापला दावा ठाेकणार अाहे.
केंद्रीय मंत्र्यांची पुरस्कार वितरणाला उपस्थिती
पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री िनतीन गडकरी राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. याप्रसंगी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आयोजन समिती कार्याध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे उपस्थित राहतील.
एक लाख रोख, चांदीची गदा
महाराष्ट्र केसरी िकताबावर ताबा िमळवणाऱ्या पहिलवानाला एक लाख रु. रोख व चांदीची गदा प्रदान केली जाणार असून केसरी गटात गादी व माती या प्रकारातील दोन्ही विजेत्यांदरम्यान महाराष्ट्र केसरी पदासाठी लढत होईल. अन्य प्रत्येक गटातील विजेत्यांना सुवर्ण, उपविजेत्याला रौप्य व तृतीय पहिलवानाला कांस्यपदक प्रदान केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...