आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील २.८१ कोटी वृक्ष लागवडीची ‘लिम्का बुक’कडून नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/ मुंबई - एक जुलै रोजी राज्यभर पार पडलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ झाडे लावण्यात अाली हाेती. या विक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नाेंद घेतली अाहे. वन विभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाने १ जुलै रोजी राज्यात बारा तासात लोकसहभागातून तसेच विविध सामाजिक संस्था-संघटना आणि शासकीय यंत्रणांच्या मदतीने २ कोटी ८१ लक्ष ३८ हजार ६३४ वृक्ष लागवड करण्यात अाली हाेती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या दिवशी राज्यात १२ तासात १५३ प्रकारच्या झाडांच्या राेपांची लागवड, ६५ हजार ६७४ जागांवर व ६ लाख १४ हजार ४८२ लोकांच्या माध्यमातून विक्रमी वृक्षलागवड करण्यात अाली हाेती. त्याची नाेंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील वन जमिनी वाढावी आणि पर्यावरणाचा समतोल साधला जावा या दृष्टीने राज्याात २ कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली होती. या मोहिमेसाठी बरेच महिने नियोजनही सुरू होते. वनविभागासह शासनाच्याी इतर २० विभागांचा सहभाग या मोहिमेला मिळाला. तरुणाईचा सहभाग वाढावा यासाठी ‘सेल्फी विथ ट्री’सारखी अभिनव स्पर्धाही वन विभागाने घेतली गेली. येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची वन विभागाची योजना आहे.

सामूहिक प्रयत्नांचे यश
वृक्ष लागवडीत आलेले यश आणि त्याला लिम्का बुककडून मिळालेली दाद अतिशय आनंददायी आहे. वन विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि राज्यातील नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांचे हे यश असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुंबईत ‘जेसीआय’च्या वतीने मुनगंटीवार यांना मॅन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या वेळी ते बाेलत हाेते.
छायाचित्र: मुंबईतील ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाइन्सच्या (जेसीअाय) वतीने देण्यात येणारा ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार रविवारी पद्मविभूषण डॉ. बी. के गोयल यांच्या हस्ते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...