आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी विशेषः 51 हजार सापांना जिवदान देणारी, वाचा कोण आहे ही रणरागिणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलढाणा- साप नुसता दिसला तरी भल्‍याभल्‍यांना घाम फुटतो. इवलुसे पिल्‍लू जरी निघाले तरी सर्व घर बाहेर धावत सुटते. पण बुलढाणा जिल्‍ह्यातील मेहकर येथील एका सर्पमैत्रिणीने मानवी वस्‍तीतून तब्‍बल 51 हजार साप पकडून त्‍यांना जंगलात सुरक्षित स्‍थळी सोडून जिवदान दिले आहे. या रनरागीनीचे नाव आहे वनिता बो-हाडे वयाच्‍या बाराव्‍या वर्षांपासून त्‍या साप संवर्धनाचे काम करतात. महाराष्‍ट्रभर पहिली सर्पमित्र म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. सध्‍या पावसाळा सुरू झाल्‍याने सापांचा वावरही वाढला आहे. त्‍यामुळे सापांशी दोस्‍ती करणा- या वनिताताईच्‍या कार्यावर नागपंचमीच्या निमित्ताने divyamarathi.com ने प्रकाश टाकला आहे.
धोका पत्‍कारून पकडले जहाल विषारी साप
वनिताताई यांनी धोका पत्‍कारून मोठमोठे जहाल विषारी सापही खेडोपाडी पकडले आहेत. भारनियमनाच्‍या काळात त्‍यांनी खेडोपाडी जाऊन मोबाईल टॉर्चच्‍या प्रकाशात मण्‍यार, घोणस, नाग असे जहाल विषारी साप पकडले. विशेष म्‍हणजे त्‍यांना एकदाही सर्पदंश झाला नाही.
साप आढळल्‍यास लोक करतात फोन
मानवी वस्‍तीत निघणारा साप हा विषारी असो किंवा बिनविषारी भितीपोटी लोक सापाला संपवतात. त्‍यामुळे पर्यावरण आणि बळीराजाचा मित्र असलेला साप नाहक मरतो. अन्‍नसाखळीतील महत्‍त्‍वाचा घटक असलेला सापांना जिवनदान मिळावे यासाठी वनिताताईने हे कार्य हाती घेतले आहे. त्‍यांच्‍या परिसरात कुठेही साप आढळला, तर लोक त्‍यांना फोन करून बोलावतात. नंतर त्‍या सापाला आपल्‍या ताब्‍यात घेऊन जंगलात सोडून देतात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, वनिता बो-हाडे अशा पकडतात विषारी साप, वाचा कार्याची माहिती..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​
बातम्या आणखी आहेत...