आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले दांपत्याला भारतरत्न देण्याचा प्रस्ताव धूळ खात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, असा प्रस्ताव वर्षभरापूर्वी नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने सरकारकडे याचा पाठपुरावाच केला नाही. याविषयी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली.

फुले दांपत्याला केंद्र सरकारने देशातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार द्यावा, असा प्रस्ताव नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २२ जुलै २०१५ रोजी पारित करण्यात आला होता. मनपा सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे व राज्याकडून केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार होता. मात्र, महापालिकेने असा प्रस्ताव मंजूर केला आहे, याचाच मनपा प्रशासनालाच विसर पडला होता. गुरुवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चांगलाच गाजला. विरोधकांनी सत्तापक्षासह अधिकाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले. दरम्यान, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात उशिर झाल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. त्या नंतर महापौर प्रवीण दटके यांनी पाठपुरावा करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.
बातम्या आणखी आहेत...