आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Phule, Savitribai Phule Bharat Ratna Award

म.फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न पुरस्‍कार; सरकार करणार आहे पाठपुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे कार्य लक्षात घेता त्यांचा भारतरत्न मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वधू-वर सूचक मेळाव्यात बोलताना दिले. यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळणे हा त्या पुरस्काराचा सन्मान ठरणार आहे. त्यामुळे योग्यवेळी हा पुरस्कार त्यांना मिळावा यासाठी पाठपुरावा केला जाईल. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर आमचे शासन काम करते. त्यांच्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन दीनदलित, शोषित-पीडितांसाठी विविध योजना राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माळी समाजाचे राज्यात चांगले संघटन असून त्यामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार अनिल सोले, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे यावेळी उपस्थित होते.