आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल ॲपमुळे वेळेत मिळतेय वीज बिल, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ग्राहकांना लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ज्या ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केले अशा सर्व ग्राहकांना महावितरणचे वीज बिल वेळेत मिळत आहे. शिवाय महावितरणच्या कार्यालयात जाता वीज बिल भरण्यापासून तर वीजेसंबंधीत कोणतीही तक्रारी दाखल करण्यापर्यंतच्या सर्व सेवा घरबसल्या मिळत असल्याने वीज ग्राहकांना तासंन तास रांगेत उभे राहून वीज बिल भरणे, एखादी तक्रार दाखल करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाणे या सर्व कटकटी आता इतीहासजमा झालेल्या आहेत. शिवाय मोबाईल ॲपमुळे मीटरमधील मानवी हस्तक्षेप पूर्णत: नष्ट झाल्याने ग्राहकांना अचूक वीज बिल मिळत आहे. 
 
नोव्हेंबर २०१६ पासून महावितरणने अत्याधूनिक तंत्रज्ञाचा वापर करून ग्राहकांच्या सेवेत मोबाईल ॲप आणले ,यामुळे ग्राहकांना कोणत्याही कामासाठी आता महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. या ॲपची सेवा २४ तास उपलब्ध असल्याने घरबसल्या ग्राहकांना महावितरणच्या सर्व सेवांचा लाभ घेता येतो. 
 
ग्राहकांना स्वत:च आपले रीडिंग पाठवण्याची सोय झाली हा या अॅपचा मोठा फायदा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जर एखादया ग्राहकाचे मीटरचे रीडिंग झाले नसेल, तर अशा ग्राहकांना महावितरणचा एसएमएस येतो. त्यानंतर स्वत: ग्राहक आपल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या मीटरचे फोटो काढून महावितरणला पाठवू शकतो. महावितरण ॲपमुळे वीज मीटर रीडिंग मधील मानवी हस्तक्षेप पूर्णत: नष्ट झाल्याने वीजबिलात अचूकता आली आहे. मीटरचे रीडिंग त्याचे छायाचित्र ॲपद्वारे थेट सर्व्हरमध्ये पाठविला जातो. त्यानंतर वीजबिल तयार करण्याची प्रक्रिया करण्यात येते. 
 
एकूण फंक्शन्स : ग्राहक सेवेच्या या ॲपमध्ये फंक्शन आहेत. त्यामध्ये मोबाईल क्रमांक नोंदविणे ,देयकाची माहिती,आॅनलाईन देयक, भरण्याची सुविधा ,देयकाच्या तारीखेनुसार तपशील ,रीडिंग सबमिट करण्याची सुविधा ,एका ॲपवर जास्त कनेक्शनची वीज देयके भरण्याची सुविधा, तक्रार आणि प्रतिक्रिया अशा सुविधा उपलब्ध आहेत. 

ॲप डाऊनलोड करावे : महावितरणचे अॅप हे गुगल प्ले स्टोअर ,ॲपल प्ले स्टोअर, विंडोज स्टोअर तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर महावितरण ॲप या नावाने उपलब्ध आहे. महावितरण अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून वीज ग्राहकांनी महावितरणचे हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...