आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमक्यांच्या दहशतीतूनच झाला महेंद्र ठाकूरचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा/अमरावती - मोझरी येथील महेंद्र ठाकूर याचा खून धमक्यांच्या दहशतीतूनच झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला शिवसेनेचा शहरप्रमुख अमोल पाटील याला वारंवार महेंद्रच्या एका सहकाऱ्यांकडून मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळूनच महेंद्रचा कायमचा “काटा’ काढण्यात आल्याची शक्यता प्रथमदर्शनी व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी बारा तासांमध्ये अमोल जनार्धन पाटील (३२), सागर ऊर्फ सर्जा सुरेश वाघमारे (२४) आणि स्वप्नील अनिल वानखडे (२०, सर्व रा. तिवसा) यांना कुऱ्हा येथील एका धाब्यावरून अटक केली आहे. 
 
शुक्रवारी (दि. १३) दुपारी महेंद्र ठाकूर त्याचा एक सहकारी तिवसा तहसीलमयध्ये कामानिमित्त गेले होते. त्याचठिकाणी महेंद्र अमोल पाटील यांची नजरानजर झाली. त्या ठिकाणाहून महेेंद्र त्याचा सहकारी नागपूरच्या दिशेने पसार झाले. मात्र काही अंतरावर असलेल्या एका धाब्याजवळ महेंद्रच्या दुचाकीमधील पेट्रोल संपले. त्यावेळी महेंद्रच्या मागावर अमोल पाटील त्याचे काही सहकारी होतेच. दरम्यान महेंद्रसोबत असलेला त्याचा सहकारी पसार झाला.
त्यामुळे अमोल पाटील महेंद्र यांच्यात त्या धाब्यावर शाब्दीक चकमक उडाली नंतर अमोल पाटील त्याच्या सहकाऱ्याने महेंद्रवर लोखंडी रॉड चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात महेंद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर एसडीपीओ अविनाश पालवे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय नागेश चतरकर, अरुण मेटे, सचिन मिश्रा, युवराज मानमोठे यांच्यासह तिवसाचे ठाणेदार दिनेश शेळके त्यांच्या पथकाने मारेकऱ्यांची शोधमोहीम सुरू केली. शुक्रवारी मध्यरात्रीच अमोल पाटील त्याच्या दोन सहकाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, ऑक्टोबर २०१६ ला तिवसा येथे अमोल पाटील त्याच्या सहकाऱ्यावर काहींनी हल्ला चढवला होता. मात्र त्यावेळी अमोल पाटील त्याचा सहकारी दुचाकी सोडून पसार झाले होते. त्यावेळी हल्ला चढवण्यासाठी आलेल्यांनी दुचाकी जाळली होती. या प्रकरणात पोलिसांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न कलमान्वये दुचाकी जाळणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. दरम्यान त्यानंतर महेंद्र ठाकूरचा एक नजीकचा सहकारी ज्याचा दुचाकी जाळण्यामध्ये सहभाग होता, तो अमोल पाटील याला सातत्याने जीवे मारण्यासाठी धमकावत होता. त्याच्या घराजवळ जाऊन घर कुठे आहे असे विचारणे, शहराबाहेरील युवकांना बोलवून अमोलला मारुन टाकू अशाही धमक्या महेंद्रचा तो मित्र देत असल्याचे अमोलने अटकेनंतर पेालिसांना सांगितले आहे. वारंवार मिळणाऱ्या या धमक्यांमुळे अमोल पाटील त्याचे सहकारी चांगलेच दहशतीत आले होते. त्यामुळेच मागील एक ते दीड महिन्यापासून अमोल सातत्याने घरापासून तसेच गावापासून दूर राहत होता. कारण जीवाला धोका असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शुक्रवारी महेंद्रवर हल्ला झाला त्यावेळी अमोलला धमक्या देणारा महेंद्रचा मित्र सोबतच होता मात्र तो पसार झाल्यामुळे महेंद्रवर हल्ला करून त्याचा ‘गेम’ करण्यात आला. महेंद्र त्याच्या या मित्राला नेहमीच सहकार्य करत असल्याची चर्चासुध्दा आहे. कदाचित महेंद्रच्या पाठबळामुळेच त्याचा मित्र वारंवार अमोल पाटीलला मारण्याच्या धमक्या देत होता. या धमक्यांमुळे अमोल पाटीलने महेंद्रचा कायमचा काटा काढण्यात आला, अशी चर्चा परिसरात आहे. 

^महेंद्र ठाकूरचीझालेली हत्या गॅगवारचा प्रकार नसून, या हत्येला वर्चस्वाची लढाई कारणीभूत असावी, असे प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तिघांना आम्ही अटक केली अाहे.’’ दिनेश शेळके, ठाणेदार, तिवसा.