आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्शीच्या ‘सीओं’ना नगरसेवकाची मारहाण,वरुडनंतर मोर्शीमध्येही मारहाणीची पुनरावृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी - वरुड येथील नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना नगरसेवक आप्पा गेडाम यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. ८) दुपारी निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीदरम्यान घडली.
निवडणुकीसंदर्भात नगर परिषदेच्या कार्यालयात बैठक सुरू असताना स्विकृत नगरसेवक जितेंद्र उर्फ आप्पा गेडाम यांनी तेथे येऊन विद्युत लाईटच्या काढलेल्या नगर परिषदेच्या निविदेबाबत विचारणा केली. यावरून मुख्याधिकारी वाघमोडे गेडाम यांच्यात वाद झाला. त्यात आप्पा गेडाम यांनी चिडून जात मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रयत्न केला. याबाबत मुख्याधिकारी वाघमोडे यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गेडाम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर गेडाम यांनी निविदेबाबत विचारणा करण्यास गेलो असता मुख्याधिकाऱ्यांनी शिविगाळ करत कार्यालयातून हाकलून लावल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वाघमोडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कामबंदचादिला इशारा : बैठकीलाआलेल्या कर्मचाऱ्यांनी याबाबत रोष व्यक्त केला असून मुख्याधिकारी वाघमोडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व नगर परिषद कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला.
बातम्या आणखी आहेत...