आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’ने एका वर्षात गुंतवले ४५० कोटी, म्युचुअल फंड शेअर बाजारात गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अवघ्या राज्यात हजारो गंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या मैत्रेयने २०१४ मध्ये अवघ्या एका वर्षात म्युचुअल फंड शेअर बाजारात तब्बल ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही बाब शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी मैत्रेय प्रकरणाचा तपास सुरू केल्यापासून दरदिवशी धक्कादायक माहिती आहे. मैत्रेयने ग्राहकांकडून अब्जावधी रुपये उकळले. मात्र, गुंतवणूकदारांना कोरड्या आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. दुसरीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमेतून मैत्रेयच्या संचालकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून अब्जावधीची माया गोळा केली. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही त्यांनी मालमत्ता खरेदी केली आहे. या शिवाय २०१४ या एकाच वर्षात मैत्रेयने म्युचुअल फंडामध्ये ३५० कोटी रुपये तर शेअर बाजारात १०० कोटी रुपये अशा तब्बल ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची बाब गुरूवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आली आहे. गुरूवारी पोलिसांनी मैत्रेयच्या सीएला (चार्टड अकाऊंन्टंट) माहिती घेण्यासाठी अमरावतीला बोलावले होते. सीएने मैत्रेयचे २०१४ मध्ये ऑडीट केले होते.
बातम्या आणखी आहेत...