आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रेय घोटाळा : आणखी १०० कोटींची मालमत्ता उघड होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मैत्रेयची नव्याने जवळपास १०० कोटींची मालमत्ता उघड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उघड झालेल्या मालमत्तेपैकी आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण ४७ कोटींच्या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नेमण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. गुंतवण्ूकदारांची फसगत झाल्याप्रकरणी मैत्रेयविरुध्द अमरावतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. पोलिसांनी तपासादरम्यान यापूर्वीच मैत्रेयची राज्यात असलेली जवळपास ११५ कोटींची मालमत्ता उघड केली होती, हे विशेष.

गुंतवणूकदारांना कमी दिवसात गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत अधिक पैसा मालमत्ता देण्याचे आमिष दाखवून ‘मैत्रेय’ने राज्यातील विविध शहरांत हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, अमरावती शहरात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेय ग्रूपची राज्यातील विविध शहरांत असलेली तब्बल ११५ कोटी ८८ लाख रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता यापूर्वीच उघड केली आहे. ही मालमत्ता यापूर्वी कोठेही उघड झालेली नाही, हे विशेष. या मालमत्तेपैकी १५ कोटींच्या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नेमण्यासंदर्भात शाखेने १४ सप्टेंबरला तसेच ३१ कोटी ९० लाख हजार रुपयांच्या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नेमण्यासंदर्भात मंगळवारी (दि. २७) विनंती केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी उघड केलेल्या ११५ कोटी ८८ लाखांच्या मालमत्तेपैकी आतापर्यंत ४७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे सर्व दस्ताऐवज वर्णन पोलिसांना प्राप्त झाले आहे. पोलिसांना नव्याने उघड होत असलेल्या मालमत्तेचे कागदपत्र प्राप्त होताच पोलिस पुढील कारवाई करणार आहेत. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश अणे, उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी पथकाकडून करण्यात येत आहे.पोलिसांनी उघड केलेल्या मालमत्तेपैकी जवळपास ३१ कोटी ९० लाख हजारांच्या मालमत्तेचा निर्णय घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी नेमण्यासंदर्भात मंगळवारी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. अजून जवळपास ५० कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्र पोलिसांना प्राप्त झाले.
३१ कोटी ९० लाख हजारांची मालमत्ता अशी
१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे १०१६ वर्गफुटाचा गाळा असून याची किंमत २५ लाख ५२ हजार रुपये.
२) सिंधदुर्ग जिल्ह्यातील मौजे देवली येथील सर्व्हे नंबर १५४ ८५ पैकी हीस्से किंमत ६५ लाख २८ हजार रुपये.
३) जळगाव जिल्ह्यातील मौजे मेहरुन मध्ये औरंगाबाद ते जळगाव मार्गावरील होटेल ‘मैत्रेयास’ किंमत अंदाजे ३० कोटी तसेच हॉटेलला लागून लॉन किंमत ५६ लाख.
४) कोपरगाव येथे हजार १८३ चौफुटाचा गाळा किंमत ३२ लाख हजार.
५) ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे ५१.१२ चौमी आकाराचे गाळे किंमत ११ लाख २० हजार रुपये.
नव्याने उघड १०० कोटींची मालमत्ता
१) मुंबईमधील खार भागात असलेले अपार्टमेंट २) सांगलीमधील अपार्टमेंट ३) कर्नाटकमधील अथनी येथील रहीवासी संकुल ४) कच्छ, गुजरात ५) शिर्डी येथील ब्रम्हयोग संकुल ६) मुंबईला लागून असलेले ‘अरण्य’ परिसर ७) गुजरातमधील बडोदा शहरात बांधण्यात आलेले १२० बंगले, या ठिकाणी एका बंगल्याची किंमत जवळपास कोटीच्या घरात असण्याची शक्यता. ८) मंुबईतील भोईसर परिसरात ‘मामाचा गाव’ नामक रिसोर्ट आणि ९) मिनरल वॉटरची कंपणी ही मालमत्ता अमरावती आर्थीक गुन्हे शाखा पोलिसांनी नव्याने उघड केली असून याची किंमत जवळपास १०० ते १२५ कोटींच्या आसपास.
पुन्हा मालमत्ता उघड होण्याची शक्यता
तपासा दरम्यान मैत्रेयची यापूर्वी ११५ काेटींची मालमत्ता उघड केली असून त्यापैकी ४७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नेमण्यासंदर्भात अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. आताराज्याबाहेरील मैत्रेयची नऊ ठिकाणांच्या मालमत्तेची माहिती मिळाली. ती उघड करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. गणेश अणे, निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.
बातम्या आणखी आहेत...