आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’विरुद्ध सिटी कोतवालीमध्ये नऊ दिवसांत दोन हजारांवर तक्रारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘मैत्रेय प्लॉट्स अॅन्ड स्ट्रक्चर प्रा.लि, मैत्री सुवर्ण सिद्ध प्रा. लि.’ या कंपनीकडून गंुतवणूकदारांना मोठा आर्थिक झटका बसल्याचे समोर येताच कोतवाली पोलिसांत तक्रारदारींचा ओघ वाढला आहे. ते १४ जुलै या नऊ दिवसांत तब्बल हजारांवर तक्रारदारांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारींची संख्या आणि त्यातील नमूद फसवणुकीचा आकडा लक्षात घेता गुंतवणूकदारांची दोन कोटींपेक्षा अधिक रकमेने फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दाखल गुन्ह्यात आता एमपीआयडी अधिनियमाप्रमाणे कलम वाढवले आहे.
शहरातील हजारो व्यक्तींनी २००५ पासून ‘मैत्रेय प्लॉट्स अॅन्ड स्ट्रक्चर प्रा.लि मैत्री सुवर्ण सिद्धी प्रा. लि.’ कंपनीसाठी एंजट म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती. सदर कंपनीमध्ये गंुतवणूक केल्यास गुंतवणुकीपेक्षा अधिक परताव्यासह ठरावीक वेळी वरच्यावर रक्कम परत करण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदार तसेच एजंट म्हणून दुहेरी लाभ होईल, अशी हमी तक्रारदारांना मैत्रेयच्या संचालक याच ठिकाणी काम करणाऱ्यांनी मेळावे घेऊन दिली होती. याचवेळी कंपनीचा विस्तार प्रशस्त असून, गुंतवणूक केल्यास फायदाच होईल, ३० विश्वास दाखवल्यामुळे शहरातील अनेकांनी या ठिकाणी गंुतवणूक केली. गुंतवणूक केल्यास सहा वर्षांत रक्कम परत मिळेल, रक्कम नाही मिळाली तर भूखंड मिळेल, इतकेच नाही तर काम करताना एखाद्या प्रतिनिधीचा मृत्यू झाला तर त्याचा लाख रुपयांचा विमा देण्यात येईल, अशी प्रलोभने दिल्याचे तक्रारदारांनी पोलिसांत सांगितले आहे. या प्रकरणात पहिली तक्रार कोतवाली पोलिसात मार्च महिन्यात प्राप्त झाली होती. त्यामुळे ११ मार्च २०१६ ला पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास सुरूच असताना जुलै २०१६ ला मैत्रेयच्या ३० एजंटांनीच कोतवाली पोलिसांत पुन्हा तक्रार दिली. या तक्रारीनंतर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रारदारांच्या रांगा लागल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गोकूल ठाकूर करत आहे. दरम्यान प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता कोतवालीचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ठाकूर यांनी या प्रकरणात ११ जुलै २०१६ ला प्रकरणातील संशयित आरोंपिविरुध्द एम. पी. आय. डी. (महाराष्ट्र ठेवीदार गुंतवणूक हीतरक्षण कायदा अधिनियम १९९९) हे कलम वाढवले आहे.

जिल्ह्यात जवळपास ते हजार एजंट असून, त्यांच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांनी मैत्रेयमध्ये रक्कम गुंतवली आहे. दरम्यान मागील काही वर्षांपासून शहरात जयस्तंभ चौकातील गुलशन टॉवरमध्ये मैत्रेयचे कार्यालय सुरू केले होते. मात्र फेब्रुवारी २०१६ पासून हे कार्यालय बंद आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांची रक्कम गुंतवणुकीची मुदत संपून परतावा मिळायला पाहिजे, त्यांची रक्कम परत मिळाली नाही, मैत्रेयकडून गुंतवणूकदारांना दिलेले चेक बाऊन्स झाले. त्यामुळे आपली फसगत होत असल्याचे गंतवणूकदारांच्या लक्षात आले. या प्रकरणी कंपनीचे संचालक अधिकारी अशा एकूण ११ जणांविरुध्द कठोर कारवाई करून गुंतवणूकदारांची रक्कम परत करावी, असे गंुतवण्ूकदारांनी तक्रारीत उल्लेख केला आहे. श्रीसूर्यानंतर ‘मैत्रेय प्लॉट्स अॅन्ड स्ट्रक्चर प्रा.लि मैत्री सुवर्ण सिद्धी प्रा. लि.’ या कंपनीने शहरातील हजारो गुंतवणूकदारांना मोठा झटका दिल्याने याप्रकरणी पुढे काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
^मैत्रेय प्रकरणात अधिक माहिती घेतो. प्रकरणाची व्याप्ती मोठी असेल तर नक्कीच या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात येईल. दत्तात्रयमंडलिक, पोलिस आयुक्त.

‘एमपीआयडी’ दाखल
^सदर प्रकरणात आतापर्यंत आमच्याकडे दोन हजारांवर तक्रारदारांनी तक्रार केल्या आहेत. यामध्ये मार्च महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. मात्र तपासादरम्यान आम्ही ११ जुलै २०१६ ला या प्रकरणात ‘एमपीआयडी’ दाखल केला आहे. पीएसआयगोकुल ठाकूर, तपास अधिकारी,कोतवाली पोलिस ठाणे.

एसीपींची परवानगी घेतली
^मैत्रेय प्रकरणात आमच्याकडे दरदिवशी सरासरी १०० ते १५० तक्रारदार येत आहेत. आतापर्यंत जवळपास दोन हजारांवर तक्रारदारांनी तक्रार नोंदवली आहे. सदर प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होऊ शकतो. त्या संदर्भात आम्ही एसीपींची परवानगीसुद्धा घेतली आहे. किशोरसूर्यवंशी, ठाणेदार शहर कोतवाली.

आयुक्तालयातील ही पहिलीच वेळ
एकाच प्रकरणात तब्बल दोन हजारांवर व्यक्तींनी पोलिसांत तक्रार नोंदवण्याची ही पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. तीन वर्षांपूर्वी शहर पोलिसात ‘श्रीसूर्या’ विरुद्ध गुन्हा दाखल झाला तेव्हापासून आतापर्यंत ८१५ तक्रारदार पोलिसांत पोहोचले. मात्र मैत्रेयमध्ये अवघ्या काही दिवसांतच तब्बल हजार १०० च्या अासपास तक्रारदार पोलिसांत गेले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस पुढील तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...