आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन मूल्य जाहीर व्हावे, यासाठी उभारावे आंदोलन; अरुण देशपांडे यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विविध करांच्या गुंतागुंतीमुळे अाजवर खरी अडचण होती. आता मात्र दिवस बदलत चालले आहे. वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना एकाच दिवशी हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. परंतु, एकाच देशातील विविध शहरांत एकाच कंपनीची एकच वस्तू ही वेगवेगळ्या किमतीत मिळत असते. असे प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी जागृत होऊन उत्पादन मूल्य जाहीर व्हावे, यासाठी आंदोलन उभारायला हवे, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी केले आहे. 

ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना वजन, मूळ किंमत, उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि त्या वस्तूमध्ये नेकमे कोणते घटक आहेत याची जागृतपणे माहिती घ्यायला हवी. याबाबत अन्न सुरक्षा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच अन्नधान्यात भेसळ आढळल्यास किवा ग्राहकांकडून कोणतीही तक्रार आल्यास लहान, मोठे व्यापारी असा भेदभाव करता कठोर कारवाई करावी, असे निर्देश दिल्याचेही देशपांडे यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले. 

कोणत्याही वस्तुंवर जी किमत एमआरपीम्हणून छापलेली असते त्यापेक्षा एकही रुपया दुकानदाराला जास्त घेता येत नाही. असे झाल्यास ग्राहकांनी सरळ तक्रार करावी. वजन मापे निरीक्षक खात्यामार्फत ग्राहकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्याचा सर्वांनीच लाभ घ्यायला हवा. एमआरपी जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर अचूक होईल, अशी हमीही त्यांनी दिली. 

शहरातील काही हाॅटेल्समध्ये खाद्यपदार्थांत आक्षेपार्ह वस्तू आढळल्याचे राज्य ग्राहक कल्याण समितीच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिले असता या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई करण्यात आली याची संबंधितांकडून माहिती घेताे. ग्राहकांचे हित हे सर्वतोपरी आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वच्छता, भेसळ याबाबत काटेकोर राहण्याचे निर्देश देत कठोर कारवाई करण्याची आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

ग्राहक बाजारपेठेचा राजा 
ग्राहकहा बाजारपेठेचा राजा आहे. त्याला कोणत्याही दुकानदाराला वेठीस धरता येणार नाही. यासाठी ग्राहकांनी जागृत व्हायला हवे. वजन, मात्रा दर याची आधी शहानिशा करावी. जर बनावटपणा, फसवणूक होत असल्याचे आढळल्यास आमच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. त्यांनी जर कारवाई केली नाही तर अधिकाऱ्यांविरुद्ध आसूड घेऊन आम्ही उभे अाहोत. शासन ढिले नसून प्रशासन ढिले आहे. ग्राहकांच्या कल्याणासाठी शासन तत्पर असल्याचे मतही देशपांडे यांनी व्यक्त केले. 

या क्रमांकांवर करता येणार तक्रार 
दुकानदार ग्राहकांकडून मुळ किमतीपेक्षा एक रुपयाही जास्त घेत असेल तर अमरावती शहरासाठी ०७१२-२६६३०८९ या क्रमांकावर तक्रार करता येईल. तसेच ९८६०७३६२०० या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर माहिती देता येईल. विशेष बाब अशी की, १८००२२२३६५ शेवटचा क्रमांक ३६५ अर्थात वर्षभरात कधीही अन् २४ तास ही सेवा सुरू असते. यावर तक्रार केल्यानंतर ७२ तासात कारवाई केली जाईल. याउपरही काही अडचण आल्यास माझ्या कार्यालयातील ०२२-२२६२६०६१ या क्रमांकावर फोन करावा. 
बातम्या आणखी आहेत...