आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात तीन दिवसात २३ कुख्यात गुंडांवर मकाेका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सातत्याने टीका होत असताना शहर पोलिस अतिशय आक्रमक झाले अाहेत. मागील तीन दिवसात २३ कुख्यात गुंडांवर मकाेकानुसार कारवाई करण्यात आली.

शहरात अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांची हिंमत इतकी वाढली की शहरात अनेक कुख्यातांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती झळकू लागल्या. कुख्यात संतोष आंबेकर याने प्रजासत्ताक दिनाला त्याच्या सहकाऱ्यांसह मिरवणूक काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांनी आंबेकर टोळीतील ११ जणांवर मोक्काची कारवाई केली. त्यानंतर राजू भद्रे टोळीतील तसेच गोल्डी सरदार टोळीतील दोघांवर कारवाई करण्यात आली. भद्रे टोळीने अलिकडेच एका बिल्डरचे अपहरण करून पावणेदोन कोटींची खंडणी वसुली केल्याचे आढळून आले होते.