नागपूर/अमरावती- अमरावती जिल्ह्यात एका नरभक्षक वाघिणीने दोघांचा जीव घेतला आहे. या वाघिणीने आतापर्यंत 50 हून अधिक पाळीव प्राण्यांचाही फडशा पाडला आहे.
वर्ध्यातील जंगलातून वाघिण अमरावती जिल्ह्यात
या वाघिणीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हगिरी जंगलातून वर्धा येथील अभयारण्यात सोडण्यात आले होते. वन विभागाचे कर्मचारी मागील 15 दिवसांपासून या वाघिणीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यात अजून यश आलेले नाही. वर्ध्यातील जंगलातून ही वाघिण अमरावती जिल्ह्यात आली आहे. या वाघिणीच्या शरीरावर चिप लावण्यात आली असून तिच्या लोकेशनविषयी माहिती मिळत आहे. जंगल असणारे कॅमेरेही तिच्या हालचाली टिपत आहेत. परंतु ही वाघिण सारखी जागा बदलत असल्याने तिला पकडणे अवघड झाले आहे. सध्या ती घोराट येथील जंगलात फिरत आहे. या वाघिणीला पकडण्यासाठी आंध्र प्रदेशातूनही एक पथक आले आहे. पण अजुनही या पथकाला कोणतेही यश मिळालेले नाही.