आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंबळा कालवाग्रस्तांची ‘मन की बात’ वाचा ,पंतप्रधानांना वडकी येथून पत्र पाठवण्यास सुरवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - बेंबळाधरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याची अमृत योजना रद्द करावी, बेंबळा धरणातील पाणी शेती सिंचनासाठी राखीव पेयजल साठा फक्त पूनर्वसन गावे लाभक्षेत्रातील गावांनाच द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी बेंबळा कालवाग्रस्त शेतकरी दहा हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवणार आहेत. या आंदोलनाची सुरवात वडकी येथून केली.पहिले पत्र अनंतराव वाढई या बेंबळाग्रस्त शेतकऱ्याने लिहीले. सोमेश्वर पिराडे, सतीश जाधव, राजेंद्र शेंबडे, अरूण फुटाने, पुंडलीक झोटिंग, ज्ञानेश्वर तोडासे, अजयसिंग ठाकुर, मोहन लाड, अरूण भोयर, प्रकाश अलोणे, विलास क्षीरसागर, शरद होरे, विठ्ठल फुटाणे, मोहन इखार, डॉ.संजय पवार, डॉ.अशोक फुटाणे, बाबाराव महाजन, सुधीर जवादे यांच्या उपस्थितीत कालवेग्रस्तांची ‘मन की बात’ का कार्यक्रम पार पडला. 
बातम्या आणखी आहेत...