आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीला आणण्यासाठी गेलेले वडील बेपत्ता, पोलिसांनी चौकशीकरिता जावयाला घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी- अवघ्या तीन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या मुलीचा सासरी शारीरिक मानसिक छळ होत असल्याने शनिवारी तिला माहेरी परत आणण्याकरिता गेलेले वडील अचानक बेपत्ता झाल्यामुळे परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे. दिलीप श्रावण सोनारे (५०) रा. मधुसूदन नगर असे मुलीच्या वडिलांचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या भावाच्या तक्रारीवरून जावई भीमराव आनंदराव डांगे, रा. घाटलाडकी (सांबोरा) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सोनारे यांच्या मुलीचा विवाह घाटलाडकी येथील भीमराव डांगे याच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला. मात्र लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींनी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला. शनिवारीही सासरच्यांनी तिला मारहाण केली. ही बाब तिने वडिलांना सांगितली.

सायंकाळी सोनारे हे मुलीला आणण्यासाठी तिच्या सासरी निघाले, परंतु ते तिच्या सासरी पोहाेचलेच नाही. दरम्यान सायंकाळी साडेसात वाजता मुलाच्या मोबाईलवर दोन इसम मारहाण करत असल्याची माहिती त्यांनी दिली. या संभाषणाच्या रेकॉर्डिंगच्या आधारे नातेवाईकांनी पोलिसात मुलीच्या सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली असून चौकशीसाठी जावई भीमराव डांगे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...