आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manish Gawande Tried To Commit Suicide By Shooting Himself

ताजा महाराष्‍ट्र: एसीबीच्या कारवाईतून वाचण्यासाठी पोलिसाने केला गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- लाचलुचपत विभागाच्या पथकावर सहाय्यक पोलिस निरीक्षकाने गोळीबार केल्‍याची धक्‍कादायक घटना नागपूरमध्‍ये घडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक भडकला नि त्‍याने पथकावरच गोळीबार केला. पाचपावली परिसरात ही घटना घडली आहे.
मनीष गावंडे असे गोळीबार करणा-या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव असून त्‍याला ताब्‍यात घेण्‍यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पण एका जबाबदार पोलिसाने लाच घ्‍यावी व कारवाईसाठी आलेल्‍या अधिका-यांवर गोळीबार करावा ही संतापजनक बाब असल्‍याच्‍या प्रतिक्रीया येत आहेत.
या प्रकरणामुळे लाचलुचपत विभागाचा संशय आणखी बळावला व पथकाने गोळीबार करणा-या मनीष गावंडे या पोलिस निरीक्षकाच्‍या घराची झडती घेण्यात काम हाती घेतले. पोलिस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कापड दुकानाला आग, लाखोंचा माल खाक.., पेव्हर ब्लॉकच्‍या अडचणींपासून मुंबईकरांची होईल सुटका.., मुंबईत दोन बसमध्‍ये अपघात...