आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम मंचच्या इफ्तार पार्टीशी संघ परिवाराचा संबंध नाही : मनमाेहन वैद्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचाने दाेन जुलै रोजी दिल्ली येथे इफ्तार पार्टी अायाेजित केली अाहे. मात्र या पार्टीवरून अपुऱ्या माहितीच्या अाधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली जाणारी टीका अयाेग्यच अाहे. कारण मुळात राष्ट्रीय मुस्लिम विचार मंच ही संघ परिवारातील संघटना नाही, असे स्पष्टीकरण संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिले.

राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचाने आयोजित केलेल्या पार्टीवरून माध्यमांसह शिवसेनेनेही संघावर टीका केली अाहे. ‘संघाने राममंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा सोडला काय?’ असा सवाल शिवसेनेने केला आहे. त्यावर वैद्य म्हणाले, ‘राष्ट्रीय मुस्लिम विचार मंच ही संघटना परिवारातील नाही. ती राष्ट्रवादी विचाराने प्रेरित मुस्लिमांकडून चालवण्यात येते. इंद्रेशजी हे संपर्क अधिकारी आहेत. पण इंद्रेशजी तिथे गेले म्हणून इफ्तार पार्टी संघाची होत नाही.’

संघसर्वांना भेटतो : विविधस्तरांतील व्यक्तींना भेटणे तसेच संस्था-संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन संवाद साधून वैचारिक देवाणघेवाण संघ नेहमीच करतो. अनेक जण संघाला बोलावतात. समाजाची स्पंदने जाणून घेण्यासाठी संघ या कार्यक्रमात जातो. ख्रिश्चन समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही संघ निमंत्रणावरुन सहभागी झाला होता. आताही राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचाने आमंत्रित केले आहे, असे वैद्य म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...